Venus Transit in Cancer : सुख आणि सुविधांचा कारक शुक्र ग्रह 30 मे रोजी गोचर ( Shukra Gochar ) करणार आहे. मे रोजी संध्याकाळी रात्री 7.39 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश ( Venus Transit in Cancer ) करणार आहे. शुक्र ग्रह हा सध्या मिथुन राशीमध्ये आहे. मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या शुक्र गोचरचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक परिणाम होणार आहे. मात्र यामध्ये 5 अशा राशी आहेत, ज्यांच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसणार आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण फलदायी ठरणार आहे. वैवाहिक लोकांसाठी हा काळ फार चांगला असण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. याचसोबत तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळणार आहे. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्यावर भर द्याल. उत्तम प्रमोशनची शक्यता देखील नाकारता येत नाही.
शुक्राचं गोचर हे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिती मजबूत करणार ठरणार आहे. यावेळी कौटुंबिक आनंद तुम्हाला मिळणार आहे. मुख्य म्हणजे या काळामध्ये नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकणार आहे. जोडीदारासोबत तुमचे संबंध बिघडले असतील तर ते सुधारू शकणार आहेत. नवीन काम हाती घेण्याचा विचार करू शकता. वडिलोपार्जित गोष्टींशी निगडीत असलेल्यांसाठी हा लाभाचा काळ आहे.
शुक्राचं हे गोचर कर्क राशीमध्ये होणार आहे. शुक्राचं गोचर या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात शुभ परिणाम देणार आहे. यावेळी तुमचं लव्ह लाईफ चांगलं होणार असून जोडीदाराशी तुमचं नातं घट्ट होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार होऊन भरपूर पैसे मिळणार आहेत. भविष्यात तुम्हाला आज घेतलेल्या निर्णयांचा फायदा होणार आहे. घरामध्ये कोणतंही धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं गोचर हे इच्छा पूर्ण करणारं ठरणार आहे. या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्ही संपन्न राहणार आहे. अविवाहितांसाठी योग्य स्थळ येणार असून त्यांच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा शोध पूर्ण होणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. लोकं तुमचा सल्ला मागतील आणि त्या माध्यमातून यशस्वी होतील. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. शिवाय हा काळ तुमच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने खूप लाभदायक असणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )