Shukra Gochar 2022: कन्या राशीत 5 दिवसानंतर शुक्र करणार एन्ट्री, लक्झरी लाईफ अनुभवता येणार!

24 सप्टेंबर 2022 रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य आणि बुध आधीपासूनच ठाण मांडून बसले आहेत.

Updated: Sep 19, 2022, 01:02 PM IST
Shukra Gochar 2022: कन्या राशीत 5 दिवसानंतर शुक्र करणार एन्ट्री, लक्झरी लाईफ अनुभवता येणार! title=

Shukra Rashi Parivartan 2022: ग्रह राशी बदल करणार म्हटलं की ज्योतिष्यांचं गोचराकडे लक्ष लागून असतं. त्या काळात ग्रह काय फळ देणार याबाबत भाकीत वर्तवलं जातं. कोणत्या ग्रहासोबत युती करणार आणि दोन ग्रहांमध्ये असलेलं नातं यावर सगळं अवलंबून असतं. 24 सप्टेंबर 2022 रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य आणि बुध आधीपासूनच ठाण मांडून बसले आहेत. तसेच कन्या राशीत बुधादित्य योग सुरु आहे. अशा स्थितीत कन्या राशीतील शुक्र परिवर्तनामुळे विशेष ग्रहस्थिती निर्माण होईल. ज्याचा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. शुक्राचं गोचर 3 राशीच्या लोकांसाठी पैसा, प्रेम आणि समृद्धीसाठी अनुकूल ठरेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शुक्राचे संक्रमण शुभ ठरेल.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने शुक्राचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. या लोकांच्या जीवनातील काही समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. आदर आणि प्रभाव वाढेल.

मिथुन : शुक्राच्या गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. व्यवसाय वृद्धी होईल. धनलाभ आणि मालमत्ता मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला आनंदी आणि आरामदायक वाटेल.

कन्या : शुक्र ग्रह स्वतः कन्या राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. शुक्र गोचर त्यांना शुभ फल देईल. धनलाभ होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ आहे. व्यवसायात वाढ होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)