Surya Grahan 2024 : हिंदू धर्मात सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचं आणि अशुभ मानलं जातं. 2024 मधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री 9.13३ वाजता सुरू होईल आणि 3 ऑगस्टला पहाटे 3.17 वाजेपर्यंत राहणार आहे. हे सूर्यग्रहण एकूण अंदाजे 6 तास 4 मिनिटं असणार आहे. भारताव्यतिरिक्त, वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण अर्जेंटिना, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक, दक्षिण अमेरिका, पेरू आणि फिजी इत्यादी देशांमध्ये दिसणार आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. यावेळचे सूर्यग्रहण काही राशींसाठी घातक ठरणार आहे. (Solar eclipse or Surya Grahan on Pitru Amavasya crisis will increase on these 4 zodiac signs)
सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या लोकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत अशी काही घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना या काळात इजा होण्याची सर्वाधिक धोका आहे. कन्या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घेणे या काळात आवश्यक आहे.
तूळ राशीच्या सहाव्या घरात राहु असल्यामुळे व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासलंय. जोपर्यंत राहू सहाव्या भावात राहतो तोपर्यंत तूळ राशीच्या लोकांना आजार राहणार आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या लोकांना खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घ्यावी.
सिंह राशीच्या आठव्या घरात राहु असल्यामुळे तुम्हीही अडचणींनी त्रस्त होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांचे जोडीदार आजारी पडू शकतात. जर तुमची जीवनसाथी महिला असेल तर पोटाशी संबंधित समस्या आणि जर तुमचा जीवनसाथी पुरुष असेल तर तिच्या डोळ्यांना आणि उजव्या हाताला दुखापत होण्याचा दाट शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी आठव्या भावातील राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराला गूळ आणि पाणी अर्पण करणे विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. भगवान शिवाच्या कृपेने राहूचा नकारात्मक प्रभाव संपणार आहे.
मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. हा रोग त्यांचे मित्र, जोडीदार आणि नातेवाईकांना त्रासदायक ठरणार आहे. राहुमुळे मीन राशीच्या लोकांना अशा आजारांचा त्रास होऊ शकतो जो कोणत्याही अहवालात सापडत नाही मात्र त्यांचे आरोग्य खराब असणार आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला समर्पित मंत्रांचा जप करावा लागणार आहे. भगवान शंकराला जल अर्पण केल्याने त्यांना त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)