Somvati Amavasya 2023 in marathi : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी अमावस्या येते. या महिन्यातील अमावस्या ही खास आहे. कारण यंदा दुहेरी योग आला आहे. फाल्गुन अमावस्येला दुर्मिळ योगायोग घडला आहे. यावर्षी फाल्गुन महिन्यातील अमावस्या सोमवार 20 फेब्रुवारी 2023 ला (somvati amavasya 2023 date)आहे. सोमवार अमावस्या असल्याने याला सोमवती अमावस्या असं पण म्हटलं जाणार आहे. या दिवशी स्नान केल्याने पितृदोष, कालसर्प दोष यापासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते. त्यामुळे जाणून घ्या सोमवती अमावस्येचा शुभ काळ, शुभ योग आणि नियम...(somvati amavasya 2023 date 20 February yoga puja muhurat upay falgun amavasya for money in marathi)
फाल्गुन सोमवती अमावस्या तिथी सुरु- 19 फेब्रुवारी 2023, दुपारी 04.18
फाल्गुन अमावस्या समाप्ती - 20 फेब्रुवारी 2023, दुपारी 12.35 वा.
स्नान - दान मुहूर्त - 07.00 am - 08.25 am (20 फेब्रुवारी 2023)
पूजा मुहूर्त - सकाळी 09.50 - सकाळी 11.15 (20 फेब्रुवारी 2023)
पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी अमावस्येचे सर्व दिवस श्राद्धविधीसाठी योग्य आहेत. विशेषत: सोमवती अमावस्येला पूजा आणि तर्पण यांचं दुहेरी फळ मिळणार आहे. यंदाच्या फाल्गुन अमावस्येला सोमवार आणि शिवयोगाचा योगायोग आहे. हा दिवस आणि योग दोन्ही महादेवाला समर्पित आहेत. अशा स्थितीत या दिवशी भोलेनाथाची पूजा करून, मंत्रोच्चार, तपश्चर्या, श्राद्धविधी केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते.
शिवयोग - 20 फेब्रुवारी 2023, सकाळी 11.03 ते 21 फेब्रुवारी 2023, सकाळी 06.57 पर्यंत
फाल्गुन महिन्यातील सोमवती अमावस्येला शुभ मुहूर्तावर स्नान करून पितरांचं श्राद्ध विधी करा. त्यानंतर गायत्री मंत्राच्या 5 वेळा जप करा. असं केल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या नष्ट होतात. जीवनात आनंद आणि पैशाचा पाऊस पडले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाला दूध, दही, मध, तूप, गंगाजल, साखरेचा रुद्राभिषेक करावा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा . यामुळे चंद्र बलवान होतो. त्यानंतर चांदीच्या नाग-नागिनची पूजा करावी. मग त्यांना पांढऱ्या फुलांसह वाहत्या पाण्यात अपर्ण करावे. असं केल्यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळतं अशी मान्यता आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या सुताने 108 वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला 5 प्रकारची फळे अर्पण करा. नंतर ते मुलींना दान करा.
सोमवती अमावस्येला या तीन गोष्टी केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्याचं वरदान मिळतं आणि आर्थिक समस्या दूर होतात. मुलंही चिरंजीवी राहतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)