Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करु नका 'ही' कामं, अन्यथा पितरांचा होईल अनादर

Somvati Amavasya Pitra Dosh : आज सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. आजची अमावस्या ही खास आहे. आजच्या दिवशी पितरांना नाराज करुन चालत नाही. 

Updated: Feb 20, 2023, 06:47 AM IST
Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करु नका 'ही' कामं, अन्यथा पितरांचा होईल अनादर title=
somvati amavasya 2023 day never do these 5 things and mistake otherwise pitra gets angry with you and falgun amavasya remedies in marathi

Somvati Amavasya 2023 Pitra Dosh in marathi : हिंदू पंचांगनुसार आज अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की आजच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं. आजची अमावस्या ही खास आहे. आज पितरांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की. या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो.  (somvati amavasya 2023 day never do these 5 things and mistake otherwise pitra gets angry with you and falgun amavasya remedies in marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वजांच्या आशीर्वादाने व्यक्तीसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते. पूर्वजांना राग आला तर वंशजांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं असं म्हणतात. घरात कलह निर्माण होऊन व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही काही कामं करु नयेत असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

सोमवती अमावस्येला 'या' गोष्टी लक्षात ठेवा

- सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण अवश्य करा. या दिवशी चुकूनही पितरांचा अनादर करू नका. 

- गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अन्न खायला द्या. हे अन्न पितरांना मिळतं असं म्हणतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही या जीवांना त्रास देऊ नका. तुम्ही घरी जे काही अन्न शिजवाल, त्यातील काही भाग या प्राण्यांनाही द्या.

-  अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांच्या मार्फत तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादींची प्रतीक्षा करतात. ते मिळाले नाही तर ते त्यांच्या वंशजांवर रागावतात. दुःखी होऊन वंशजांना शाप देतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

- ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि इतर उपद्रवी पदार्थांचं सेवन करू नये. असे केल्याने नकारात्मकता वाढते. एवढंच नाही तर ते तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. 

-  यासोबतच अमावस्या तिथीला ब्रह्मचर्य नियमांचं उल्लंघन करू नये. यासोबतच अमावस्येच्या पूजेच्या वेळी पितृसूक्त किंवा पितृ स्तोत्राचे पठण केल्यास शुभ फळ मिळतं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)