राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Sep 20, 2020, 09:18 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा
संग्रहित फोटो

मेष - व्यापाऱ्यांसाठी दिवस ठिक नाही. कोणालाही उधार देऊ नका. नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये टेन्शन वाढू शकतं. वाद होऊ शकतो. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

वृषभ - विचार केलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. विचारांमध्ये सकारात्मक बदल होतील. आखलेल्या योजना पूर्ण होऊ शकतात. मित्रांची, भावंडांची मदत होईल. 

मिथुन - व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. चांगल्या संधी मिळतील. चांगल्या बोलण्यामुळे कामं पूर्ण होतील. तब्येतीच्या समस्या वाढू शकतात.

कर्क - कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनाप्रमाणे नसल्याने, मूड खराब होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. दररोजच्या कामात समस्या वाढू शकतात. प्रतिस्पर्धीपासून वाद टाळा. कोणावरही अवलंबून राहू नका.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. लोकांना प्रभावित करु शकाल. तुमची विचार करण्याची पद्धत इतरांना आवडेल. तुमच्या सल्ल्यामुळे इतरांना फायदा होईल. प्रेमसंबंधांसाठी दिवस सामान्य आहे.

कन्या - कुटुंबियांची  मदत मिळेल. मानसिक स्थिती संतुलित राहील. कुटुंबात आनंद राहील. करियर, गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. पैशांच्या, कुटुंबाच्या स्थितीकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. तब्येत चांगली राहील. 

तुळ -मेहनतीने यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही हाती आलेली संधी सोडू नका. दिवस चांगला जाईल. तब्येत ठिक राहील. आराम करा. दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक - पैशांच्या बाबतीत नुकसानीची शक्यता आहे. एखाद्या कायदेप्रकरणात अडकू शकता. वेळेचं भान ठेवा. काही खास कामासाठी मेहनत करावी लागेल. अचानक घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय घेऊ नका. 

धनु - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करुन करा. वरिष्ठांची बोलताना सावध राहा. कामं पूर्ण न झाल्याने तणाव वाढू शकतो. धैर्य ठेवा. शांततेत दिवस घालवा. तब्येत सामान्य राहील.

मकर - नुकसान होऊ शकतं. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे वाद होऊ शकतात. अधिक जबाबदारी  मिळू शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहावं लागेल. 

कुंभ - करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते. जुने वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करा, यश मिळेल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. इतरांकडून मदत मिळू शकते.

मीन - करियरसंबंधी निर्णय घेताना सावध राहा. विचार करुन गुंतवणूक करा. कामात चुका होऊ शकतात. इतरांचीही कामं करावी लागू शकतात. थकवा जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या. दिवस चांगला, आनंदात जाईल.