मेष : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. नशिबाची साथ मिळेल. नोकरी किंवा व्यवसायासंबंधी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी चांगला दिवस आहे. थोड्याशा प्रयत्नांनी तुमचे अडकलेले पैसे मिळतील. अचानक आलेल्या त्रासातून बाहेर पडाल. कामामध्ये घाई करू नका. अनेक गोष्टींबाबतीत काळजी आणि अनिश्चिततेचे भाव राहतील.
वृषभ : व्यवसायासाठी चांगली वेळ आहे. गुंतवणूक फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत फिरायची इच्छा होईल. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. थोडीशी डोकेदुखी जाणवू शकते. मतभेदही होऊ शकतात. शांत आणि सहनशील राहिल्यास त्याचा फायदा होईल.
मिथून : व्यवसायात भागीदारीचा फायदा होईल. मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना मेहनत केल्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. जुन्या गुंतवणूकीचेही फायदे होतील. पारिवारातील मंडळींसोबतच्या संबंधात सुधार होईल. महत्त्वाची कामं होतील. काही जुनी काम करण्याची इच्छा होईल. कोणत्याही गोष्टीला जास्त ताणू नका. आज तुमची तब्ब्येत थोडी ठिक असेल.
कर्क : एकावेळी खूप सारी कामे अंगावर घेऊ नका. तुम्ही अडचणीत येऊ शकता. कामात लक्ष लागणार नाही किंवा अडचणी येतील. घेण्यादेण्याच्या बाबतीत सतर्क राहा. या राशीची काही मंडळी आपली मेहनत आणि फायद्यापासून असंतुष्ट असतील. अनेकजण तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. कित्येक प्रकारच्या सुचना देखील मिळू शकतील. अंगदुखी किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
सिंह : व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायद्याची वेळ आहे. गुंतवणूक करण्याचा फायदा मिळू शकतो. अविवाहीत लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीची वेळ आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिळालेल्या मेहनतीच्या फळातून तुम्ही संतुष्ट होणार नाहीत. आरोग्याची तपासणी करत राहा.
कन्या : जोखमीत टाकणाऱ्या व्यवहारांपासून सावधान राहा. उधार दिलेले पैसे मुश्किलने परत मिळतील. आज वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करुनही कमी फायदे मिळतील. तुमच्या बोलण्यानेही वाद होऊ शकतात. जास्त काम असल्याने दमायला होऊ शकतं. घाईघाईत काम करु नका. जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. आरोग्यात पहिल्यापेक्षा सुधारणा होईल.
तुळ : आर्थिक बाबतीत दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. पती पत्नींमधील गैरसमज दूर होतील. वैवाहीक जीवन आनंदाचे असेल. विद्यार्थ्यांसाठी थोडा नकारात्मक दिवस असेल. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या गरजाही पूर्ण होतील. पैशांशी जोडलेली काही प्रकरण तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. वडीलांच्या तब्ब्येतीची काळजी वाटेल. तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात अडचणी वाढतील. व्यवसायात काही महत्त्वाची कामे अपूर्ण राहतील. वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार नाही. कायदेशीर प्रकरणं सुरू असल्यास मोठं पाऊल टाकण्यापूर्वी थोडा विचार करा. इतरांसोबत तणावूर्ण संबध होऊ शकतात. ऑफिस आणि व्यवसायात काही आव्हानं मिळू शकतात.
धनु : नोकरदार वर्गासाठी अनुकूल दिवस आहे. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये काही नवे काम येऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कोणत तरी अडलेलं काम पूर्ण होण्यास तुमची मदत होऊ शकते. जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लव्ह लाईफसाठी दिवस संमिश्र राहिल.
मकर : पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कुठेतरी फिरायला जाऊ शकता. नोकरदार वर्गाला नशीबाची साथ मिळू शकते. अनेक प्रकरणांत तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. कोणत्यातरी प्रकरणी संभ्रमात पडाल. पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.
कुंभ : व्यवसायात वाद होण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत देखील वाढू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कुठेतरी फिरायला जाल. नोकरदार वर्गाला नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमचं म्हणण योग्य पद्धतीने मांडता येणार नाही. तब्ब्येतीच्या बाबतीत दिवस थोडासा चांगला असेल.
मीन : गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागले. कोणत्या तरी गोष्टीवरून जोडीदारासोबत बाचाबाची करु शकता. वायफळ खर्चापासून वाचा. मोठमोठ्या गप्पा मारु नका. जास्त धावपळ करावी लागू शकते. अनेकजण तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. एलर्जी किंवा हाडाचे दुखणे होऊ शकते.