राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना नाही भासणार पैशांची चणचण

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Sep 25, 2020, 07:23 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना नाही भासणार पैशांची चणचण
संग्रहित छायाचित्र

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधी व्यक्तींची मनंही जिंकण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. विवाहप्रस्ताव येण्याची शक्यता आहे. 

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. प्रवासयोग आहेय याचा फायदा येत्या दिवसांमध्ये होणार आहे.  जुनी कामं मार्गी लावा. 

मिथुन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशांची चणचण जाणवणार नाही. चांगल्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळं येणारा काळ तुमच्यासाठी फलदायी आहे. 

कर्क- करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी म्हणून सातत्यानं विचार कराल. जास्तीत जास्त बाबतीत संवेदनशील असाल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 

सिंह- समजात तुमच्या कार्यामुळं सन्मान मिळेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये इतरांचं सहकार्य मिळेल. चांगला वेळ सुरु आहे. मन प्रसन्न असेल. आर्थिक अडचणी दूर असतील. 

कन्या- तुमच्यासाठी आजचा दिवस अतिशय सर्वसामान्य आहे. देवाणघेवाणीचे मोठे व्यवहार कराल. नव्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. 

तुळ- कोणतंही काम अडणार नाही. आर्थिक चणचण संपेल. गरजांवर मात्र नियंत्रण ठेवा आणि खर्चावरही ताबा ठेवा. अडकलेली कामं पूर्ण होतील. 

वृश्चिक- एखाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. प्रवासयोग आहे. वास्तववादी विचार फायद्याचा ठरेल. 

धनु- महत्त्वपूर्ण व्यक्तींशी चांगला मेळ साधाल. आर्थिक परिस्थितीचाच विचार कराल. कुटुंबात ऐक्य राखा. 

मकर- कोणा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर कुटुंबाशी चर्चा करु शकता. नवी जबाबदारी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पुढं जाण्याचा योग आहे. नवं घर खरेदी करण्याचा विचार कराल.

 

कुंभ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. आजचा दिवस चांगला आहे. इतरांची मदत करुन तुम्हाला आनंद मिळेल. याच वृत्तीमुळं तुमच्याप्रती इतरांच्या मनात आदराची भावना आणखी बळावेल. आर्थिक चणचण संपेल. 

मीन- एखाद्या मोठ्या बदलासाठी तयार राहा. चांगले संकेत मिळत आहेत. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. यशाच्या मार्गावर तुमची वाटचाल योग्य दिशेनं सुरु आहे. धैर्यानं ही वाट चाला.