Surya Gochar 2023 : ग्रहांच्या राशी बदलामुळे योग सतत तयार होत असतात. राशिचक्र बदलाचा मानवी लोकांच्या भविष्यावर परिणाम दिसून येतो. सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं आणि तो सिंह राशीचा स्वामी आहे. दरम्यान सूर्य पुन्हा एकदा आपली राशी बदलणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या सूर्य वृषभ राशीत असून तो मिथुन गोचर करणार आहे. पुढील महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
बुधाच्या राशीत सूर्याचं गोचर महत्त्वाचं आहे कारण बुध हा बुद्धी देणारा मानला जातो. येत्या 15 जून रोजी संध्याकाळी 6:07 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मिथुन राशीमध्ये 16 जुलै पर्यंत राहणार आहेत. यानंतर ते कर्क राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामुळे 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत.
सूर्य गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. या काळामध्ये तुमच धैर्य आणि शौर्य वाढवण्यास मदत होणार आहे. सूर्याचं हे भ्रमण तुमच्या बिझनेससाठी फायद्याचं ठरणार आहे. या काळात तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळू शकणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्यदेव याच राशीमध्ये गोचर करणार आहे. या गोचरचा या राशींना फायदा होणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात असलेल्या समस्या सुटु शकणार आहेत. या काळामध्ये तुमचा बिझनेस मोठा होणार असून नफा मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.
सिंह देवाच्या या राशी बदलामुळे या राशीच्या व्यक्तींना यश मिळणार आहे. खासकरून याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यांना अभ्यासात तसंच परिक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळणार आहे. या काळामध्ये तुम्ही कोणतंही नवं काम सुरू कराल त्यामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली जाणार असून लाभाची संधी मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. कुटुंबातून तुम्हाला एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.
सूर्य गोचरमुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले क्षण येणार आहेत. या काळामध्ये तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळू शकणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं होणार असून इतर सहकारी आणि अधिकाऱ्यांकडून सर्वांकडून कौतुक होणार आहे. परदेश प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)