Navratri 2022 : नवरात्रोत्सवाआधी घरातून काढून टाका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

अशुभ परिणाम काय असतात हे त्या वस्तू तुम्हाला दाखवून देण्यापूर्वीच सावध व्हा...   

Updated: Sep 22, 2022, 02:13 PM IST
Navratri 2022 : नवरात्रोत्सवाआधी घरातून काढून टाका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...  title=
throw these things from house before Shardiya Navratri 2022

Shardiya Navratri 2022 Date And Time: यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्रोत्सव सुरु होण्याआधीपासूनच त्यासंबंधीची वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. घटस्थापना होण्याआधी सध्या घराघरांमध्ये काही कामं पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मग ते घर स्वच्छ (House cleaning hacks) करणं असो किंवा घरातील अडगळ बाहेर टाकणं असो. तुम्हाला माहितीये का आपल्या घरात असणाऱ्या सर्वच गोष्टी वास्तूच्या दृष्टीनं हितकारक असतात असं नाही. काही वस्तू अतिशय घातक असतात, ज्या घाराबाहेर निघणं फायद्याचं ठरतं. नवरात्रोत्सवाआधी तुम्हीही जाणून घ्या अशाच गोष्टींविषयी ज्या तुम्ही ताबडतोब बाहेर टाकणं अपेक्षित आहे. (throw these things from house before Shardiya Navratri 2022)

लसूण- कांदा (garlic- onion)
ज्या घरांमध्ये घटस्थापना होते किंवा देवीची आराधना केली जाते तिथं वातावरण शुद्ध असणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठीच (Navratri 2022) नवरात्रीपूर्वी घर स्वच्छ करताना कांदा, लसूण, अंड, मासे, मांस, मद्य अशा गोष्ट घराबाहेर काढा. 

फाटलेले बूट- चप्पल (Sandles shoes)
नवरात्रोत्सवापूर्वी घर स्वच्छ करताना फाटलेले बूट, चप्पल टाकून द्या. शिवाय काचेची तडा गेलेली भांडीही घरात ठेवू नका. घराच्या कोणत्याच भागात कचरा जमा होऊ देऊ नका. अशा वस्तू घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात. 

अधिक वाचा : Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीला हा दुर्मिळ योग, घटस्थापनेला अतिशय शुभ योग

 

खंडीत मूर्ती 
जर घरात कोणत्याही देवदेवतांची खंडीत मूर्ती असेल, तर ती लगेचच हटवा. फाटलेली देवतांची चित्रही घरात ठेवू नका. या मूर्ती आणि फोटो विसर्जित करा. या मूर्ती दुर्भाग्याचं कारण ठरू शकतात.

बंद घड्याळ
तुमच्या घरात बंद (Watch) घड्याळ असल्यास ते लगेचच घराबाहेर काढा. बंद घड्याळ अत्यंत अशुभ मानलं जातं. प्रगतीच्या वाटेत अडथळा निर्माण करण्यापासून वाईट वेळ ओढावण्यापर्यंतच्या अडचणी हे घड्याळ निर्माण करतं. 

खराब झालेलं लोणचं किंवा अन्न
तुमच्या (Kitchen) स्वयंपाकघरात जर एखादं खराब लोणचं किंवा कोणतीही खराब खाण्याची वस्तू ठेवली असल्यास घर स्वच्छ करताना या गोष्टीही बाहेर टाका. खाण्यापिण्याच्या वस्तू अशा खराब झाल्यास देवी नाराज होते असं म्हणतात. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )