राशीभविष्य २३ जानेवारी : 'या' राशीसाठी आहेत यशाचे संकेत; काहींना धनलाभाची शक्यता

पाहा कोणाच्या वाट्याला आहे आजचा शुभ दिवस 

Updated: Jan 23, 2020, 08:00 AM IST
राशीभविष्य २३ जानेवारी : 'या' राशीसाठी आहेत यशाचे संकेत; काहींना धनलाभाची शक्यता
संग्रहित छायाचित्र

मेष- अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. तुमची प्रतीमा चांगली राहील. कुटुंबाची काळजी घ्या. आजारपणा दूर होईल. 

वृषभ- व्यवसायात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनत करा. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही सक्रिय असाल. प्रवासयोग आहे. 

मिथुन- अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. आर्थिक व्यवहारांविषयी चर्चा करु नका. अडचणी वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात. 

कर्क- नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतील. कोणा एका व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यात चढ- उतार जाणवतील. अपेक्षित व्यक्तींची मदत न मिळाल्यामुळे मन खिन्न असेल. 

सिंह- कुटुंबात सुख- शांती असेल. कोणा एका चांगल्या मित्राची भेट घडेल. साथीदाराची मदत मिळेल. 

कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्ठांशी चर्चा करा. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. काही गोष्टींपासूनन तुम्हाला उसंत मिळेल. मोठ्यांचं सहकार्य मिळेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. साथीदारावर रागवू नका. कोणावरही भावना लादू नका. 

वृश्चिक- व्यवसायात फार फायदा होणार नाही. बदलीचा योग संभवतो. नवं काम सुरु करा. नको त्या कामांमध्ये फार वेळ दवडाल. विचाराधीन कामं पूर्ण होणार नाहीत. 

धनु- दैनंदिन कामं पूर्ण होतील. विचार करुन निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्ये फायदा मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर टाळा. 

मकर- आजच्या दिवशी तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे. धनलाभही होऊ शकतो. नात्यांमध्ये तणाव असेल. पण, तोही दूर होईल. 

कुंभ- आर्थिक चणचण दूर होईल. पैसे अडकतील. दिवसाची सुरुवात चांगली नसेल. कुटुंबातील व्यक्ती अडचणीत टाकतील. कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर राखा. निकाल सकारात्मक असेल. 

मीन- व्यापाराचा व्यास वाढेल. महागड्या वस्तू खरेदी कराल. खर्च वाढेल. थकवा जाणवेल.