आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ४ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Updated: Oct 4, 2019, 08:51 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ४ ऑक्टोबर २०१९ title=

मेष - आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी, व्यवसायातील टार्गेटकडे पूर्ण लक्ष द्या. एकाग्रतेने काम करा. नवीन व्यक्तीशी मैत्री होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत दिवस चांगला जाईल. आर्थिक  समस्या सुटू शकतात. 

वृषभ - नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात यश मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. सकारात्मक राहा. जोडीदाराप्रती तुमची जबाबदारी वाढू शकते. शांत राहा. नवीन लोकांच्या ओळखीतून यश मिळू शकते. 

मिथुन - नवीन कामाच्या ऑफर मिळू शकतात. विचार केलेली कामं पूर्ण होतील. खास कामासाठी सुरुवात करु शकता. जुन्या योजनांवर काम झाले नसल्यास त्यासाठी पुन्हा कामाची सुरुवात करु शकता. कामाकडे लक्ष द्या.  

कर्क - आधी केलेल्या कामांचा फायदा होऊ शकतो. मित्रांची मदत होऊ शकते. महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. शांततेत दिवस जाईल. जोडीदाराची साथ मिळेल. 

सिंह - नोकरीत सोबत काम करणाऱ्यांची मदत होईल. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. लोकांच्या समस्या सोडल्यास याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कन्या - तुमच्या मतांशी इतर लोक सहमत असू शकतात. कुटुंबातील गोष्टींमध्ये तुमची मतं स्पष्टपणे मांडा. नवीन विचार मनात येतील. विवाह इच्छुकांना विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. व्यवसायात बदल करण्याचा विचार करु शकता.

तुळ - व्यस्त राहाल. अतिशय शांत राहून कामं पूर्ण करा. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी तुमच्या मनातील गोष्टी शेयर करु शकता. जबाबदारी वाढू शकते. 

वृश्चिक - समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. परिस्थितीनुसार तुमचे विचार बदलू शकता. त्याचा फायदा होऊ शकतो. सकारात्मक राहा. 

धनु - खास कामासाठी मित्रांची मदत मिळू शकते. महत्त्वपूर्ण गोष्टीवर इतरांशी चर्चा करु शकता. मित्रांसोबत वेळ जाऊ शकतो. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. चांगलं बोलून कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

मकर - दिवस चांगला आहे. पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्या. समस्यांवर इतरांशी चर्चा केल्यास त्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. कोणतंही काम विचार करुनच करा. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. काम पूर्ण होतील. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांची मदत होऊ शकते. समजूतीने काम करा. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडे लक्ष राहील. तब्येत चांगली राहील.

मीन - दररोजची कामं पूर्ण होतील. मित्रांसोबत कार्यक्रमाची योजना आखू शकता. पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या.