Horoscope Today 9 June 2022: 'या' चुका करु नका, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

जाणून घ्या आज तुमच्या राशीत नेमकं काय वाढून ठेवलंय....   

Updated: Jun 9, 2022, 07:15 AM IST
Horoscope Today 9 June 2022: 'या' चुका करु नका, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस  title=

मुंबई : दिवसाची सुरुवात राशीभविष्यापासून. जाणून घ्या आज तुमच्या राशीत नेमकं काय वाढून ठेवलंय.... 

मेष- खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लक्षपूर्वक काम करा. आज कामाचा बोजा वाढणार आहे. तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका. 

वृषभ- तुम्ही एखाद्या गोष्टीचं नेतृत्त्वं करत असाल तर तिथं कठोर निर्णय घ्यायला शिका. शांत चित्ताने सर्व विचार करा. 

मिथुन- नोकरीचा शोध आता पूर्ण होणार आहे. सोबतच एखाद्या अशा व्यक्तीची भेट होणार आहे, ज्या व्यक्तीमुळं तुम्हाला करिअरच्या काही नव्या वाटा दिसतील. 

कर्क- आज तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. कुटुंबाची तुमच्याकडून असणारी प्रत्येक अपेक्षा आज पूर्ण होणार आहे. 

सिंह- आरोग्याची काळजी घ्या. तेलकट खाणं टाळा. आज तुमच्यावर आनंदाची बरसात होणार आहे. बऱ्याच मौल्यवान गोष्टी तुमच्या हाती लागणार आहेत. जपून ठेवा. 

कन्या- मादक पदार्थांपासून दूर राहा. धार्मिक कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवा. चुकीच्या कामांच्या मार्गी जाऊ नका. 

तुळ- विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळणार आहे. आजचा दिवस तुमच्यावर सुखाची बरसात करणार आहे. वरिष्ठांचे सल्ले तुम्हाला योग्य वाट दाखवणार आहेत. 

वृश्चिक - सहकाऱ्यांशी चांगला संवाद साधण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. 

धनु- इतर राशींच्या व्यक्तींसोबत वेळ व्यतीत कराल. संवाद चांगला असल्यामुळं त्यांच्याकडे आकर्षित व्हाल. आज प्रेमाच्या व्यक्तीची भेट घडणार आहे.

मकर- आज अजिबातच कोणाशीही संतापानं बोलू नका. मन एकाग्र ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. 

कुंभ- मोठ्यांची सेवा करण्याची संधी हातची जाऊ देऊ नका. आज तुमच्या कामाची प्रसंशा करण्यात येणार आहे. कलात्मकतेला वाव द्या. 

मीन- नोकरीच्या ठिकाणी आज मोठा दिलासा मिळणार आहे. आखलेले सर्व बेत मार्गी लागणार आहेत. इतरांची मदत करण्यासाठी हिरीरिनं पुढाकार घ्या. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x