राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी कौटुंबीक जबाबदारीवर लक्ष द्या

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: May 29, 2020, 10:46 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी कौटुंबीक जबाबदारीवर लक्ष द्या
संग्रहित छायाचित्र

मेष- अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीत कामांमध्ये मन रुळेल. जबाबदारी ओळखायला शिका. वैवाहिक व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

वृषभ- कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी इतरांकडून आदर मिळणार आहे. मेहनत करा, धनलाभ होण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्या पारड्यात आले. सदुपयोग करा. 

मिथुन- अतिघाई करु नका. धोका आहे. आर्थिक परिस्थितीविषयी फार चिंता करु नका. वायफळ खर्च कमी करा. नोकरीच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असू शकते. काळजी घ्या. 

कर्क- नोकरीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. कामातचही अडथळे उभे राहतील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नसला तरीही तो असमाधानकारक नक्कीच नाही. 

सिंह- कौटुंबीक सुख वाढेल. इतरांचीही काळजी घ्या. साथीदाराची योग्य वेळी साथ मिळेल. सोबत काम करणाऱ्यांप्रती तुमचं आकर्षण वाढेल. 

कन्या- कामाचा व्याप वाढलेला असेल. कनिष्ठांची मदत होणार आहे. बहुतांश अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा पण, समाधानकारक असेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळेल. दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. प्रगतीचा योग आहे. साथीदारावर आज जास्त खर्च होईल. 

वृश्चिक- कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा. त्यांच्याप्रतीची जबाबदारी ओळखा आणि तशी कृती करा. व्यापारात मोठा फायदा आहे. विचाराधीन कामं पूर्ण होणार आहेत. 

धनु- दैनंदिन कामं अतिशय सहज पद्धतीनं पूर्ण होतील. परिस्थिती सुधारलेली असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

 

मकर- आज कोणताही नवा व्यवहार करु नका. दिवस तितकासा चांगला नाही. प्रतीक्षा करणं हा एकच पर्याय उपलब्ध आहे. कोणत्याही वादात अडकू नका

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चांगल्या व्यक्तींच्या साथीचा फायदा होणार आहे. प्रयत्न करा. एखादी शुभवार्त मिळेल. 

मीन- व्यापारासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे. सावध राहा. पैसे खर्च करताना व्यवहारकौशल्य फायद्याचं ठरणार आहे.