मेष - व्यवसाय सुरळीत चालेल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमिनीच्या प्रकरणांमद्ये फायदा होणार आहे. कर्ज फेडण्यासाठी नवा मार्ग मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.
वृषभ- नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आज जास्त काम करावं लागू शकतं. धनलाभाचा योग आहे. नव्या घराची खरेदी करण्याचा विचार कराल. एखादी चांगली संधी मिळेल. आरोग्य सुधारेल.
मिथुन- नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. एखाद्या कामात उलटफेर झाल्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जास्तीत जास्त वेळ मित्रांसमवेत व्यतीत कराल. मित्रमंडळींना तुमची मदत होणार आहे.
कर्क- काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात अडचणी येतील. कामात मन रमणार नाही. कोणतीच चिंता नसेल. खर्च जास्त करावा लागेल. वायफळ खर्चही वाढेल. पोटाचे विकार आणि मानसिक तणाव असेल.
सिंह- कामाच्या क्षेत्राच बढती मिळण्याचा योग आहे. व्यापारात धनलाब होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. नशिबाची साथ मिळेल. धनलाब होण्याची शक्यता आहे. नव्या संधी यश देऊन जातील.
कन्या- कामाच्या ठिकाणी शत्रूंवर मात कराल. नवं काम मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. जुने मित्र भेटतील.
तुळ- अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांवर प्रभाव पाडाल. एखादी नवी जबाबदारी मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. दैनंदिन कामांतूनच धनलाभ होईल. एखादया आवडत्या व्यक्तीशी संपर्क होईल.
वृश्चिक- आरोग्याची काळजी घ्या. बोलण्यावर ताबा ठेवा. कामाच्या बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. थकवा जाणवेल. आराम करा.
धनु- व्यापाराच्या निमित्ताने एखादा लहानसा प्रवासयोग आहे. नवी जबाबदारी तुम्हाला मिळेल. नोकरीमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. काही नव्या संधी मिळतील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल.
मकर- कनिष्ठांची मदत मिळेल. एखादी नवी गोष्ट सुरु करण्याची संधी मिळेल. आज बऱ्याच अंशी तुम्ही भावूक व्हाल. साथीदारासाठी काही खर्चही कराल.
कुंभ- काम करण्याच्या पद्धतीत थोडे बदल होतील. नोकरी आणि कामात मन रुळेल. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होऊ शकतात. जबाबदारीवर प्रश्नचिन्हं उभं राहील. काही व्यक्ती तुमच्या मेहनतीचं श्रेय घेतील.
मीन- नोकरदारांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. मुलाखती चांगल्या असतील. आरोग्याची काळजी घ्या.