मेष- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आत्मविश्वासाच्या बळावर काही आव्हानात्मक कामांमध्ये यशस्वी व्हाल. समाजात आदर मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढेल.
वृषभ- ऑफिसमध्ये जास्त कामकाज असेल. काहीजण तुमच्याकडून काम काढून घेण़्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. मानसिक तणावाच्या कारणाने मन विचलित होऊन देऊ नका. जास्त विचार करु नका.
मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वकपणे बोला. प्रगतीच्या वाटा तुमच्यासाठी खुल्या असतील. व्यापारात फायदा होणार आहे. विश्वसनीय सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क- नव्या व्यापाराकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. अर्थार्जनात वाढ होईल. एखाद्या जुन्या आठवणीत मन रमेल. जुने बेत आठवतील. काहीतरी नवं करण्याची इच्छा होईल.
सिंह- व्यापारामध्ये नवे बेत आखाल. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणा एका व्यक्तीकडून कर्जही घ्याल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहब्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता आहे.
कन्या- नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही बाबतीत भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या नातेसंबंधांमध्ये काही वादळी वळणं येऊ शकतात. परिणामी आज तुम्ही थोडे चिंताग्रस्त असाल.
तुळ- कर्जापासून मुक्ती मिळेल. कामं पूर्ण करण्यावर लक्ष द्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादं सकारात्मक काम केलं तर, तुमचं आयुष्य बऱ्याच अंशी सुधारेल.
वृश्चिक - व्यापार चांगला सुरु असेल. एखादं खास काम तुम्ही पूर्ण कराल. आरोग्य उत्तम असेल. भौतिक सुखांचा विचार करण्याकडे तुमचा जास्त कल असेल. गुंतवणूकीचे बेत आखाल. आज तुम्हाला आराम मिळणार आहे.
धनु- नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी आहेत. स्वत:चा व्यवसाय असल्यास त्यावर लक्ष केंद्रीत कराल. अडचणी दूर होतील. वायफळ धावपळ करण्याची गरज नाही. थकवा जाणवू शकतो.
मकर- आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. नव्य़ा ओळखींचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मनाजोगी बदली किंवा पदोन्नती मिळणार आहे. प्रेमाच्या नात्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ- व्यवसायात स्वावलंबी असाल. नव्या नव्या व्यक्तींशी ओळख वाढेल. कामकाजही वाढेल. सोबत असणाऱ्यांचं सहकार्य मिळेल. आर्खिक परिस्थिती लवकरच सुधारेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील.
मीन- आज बोलण्यावर थोडा ताबा ठेवा. अनियमिततनेमुळे काही अडचणी आणि थकवा जाणवू शकतो. मिळकतीनुसारच खर्च करा. आत्मविश्वासावर ताबा ठेवा. कामाचा व्याप वाढेल.