close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरूवार | १७ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल? 

Updated: Oct 17, 2019, 09:54 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरूवार | १७ ऑक्टोबर २०१९

मेष- नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आज खूप सारं काम करावं लागू शकतं. पण, घाबरून जाऊ नका. नवं घर खरेदी करण्याचा विचार करु शकता. धार्मिक यात्रांचा योग आहे. आरोग्य सुधारेल. कुटुंबातील काही व्यक्तींशी कामासंबंधी गोष्टी शेअर करु शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबाच्या मदतीने आर्थिक समस्या सुटू शकतील. 

वृषभ- व्यवसाय सुरळीत सुरु राहिल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमिनीच्या बाबतीत फायदा होण्याची चिन्हं आहेत. कर्ज फेडण्यासाठी मार्ग मिळतील. वडिलांची मदत मिळेल. शांत राहा. नवीन लोकांच्या ओळखीतून यश मिळेल.

मिथुन- अनेक विचारांमुळे कामात मन रमणार नाही. काही खास गोष्टींविषयी विचार करावा लागू शकतो. कामात एकाग्रता नसल्यामुळे अडचणी वाढतील. खर्चाचं प्रमाण वाढेल. जुन्या योजनांवर पुन्हा काम करण्याची सुरुवात करु शकता. तुमच्या कामाकडे लक्ष द्या. मनात असेल त्याच गोष्टी कराल.

कर्क- नशीबाची साथ आहे. एखाद्या कामात उलटफेर होण्याची शक्यता आहे. नवं काम सुरु करण्यासाठी आडचा दिवस चांगला आहे. अनेक कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल.  महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. दिवस शांततेत जाईल. प्रत्येक प्रयत्नांत जोडीदाराची मदत मिळेल.

सिंह- कामाच्या ठिकाणी शत्रूवर मात करु शकता. नवं काम मिळण्याची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक बाबतीत जास्त विचार कराल. हाती असलेलं काम पूर्ण करा. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या- कामाच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल. प्रगतीची संधी आहे. कुटुंबामधील एखाद्या निर्णयावर तुमचे मत स्पष्टपणे मांडा. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. 

तुळ- आरोग्याची काळजी घ्या. साथीदारावर संताप व्यक्त कराल. बोलण्यावर ताबा ठेवा. स्वत:वरही नियंत्रण ठेवा. थकवा जाणवेल. आराम करा. ही वेळ तुमच्यासाठी चांगला नाही. काम पूर्ण होत गेल्याने उत्साही राहाल. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. दैनंदिन कामांतून धनलाभ होऊ शकतो. आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. पैशांच्या बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.

धनू- कनिष्ठांची मदत मिळेल. व्यापारात नव्या अडचणी समोर येतील. एक नवी सुरुवात करण्याची संधी आहे. साथीदाराला आनंदित करण्यासाठी कागी खर्च करु शकता. जोडीदाराची साथ मिळेल. चांगलं बोलून तुमची कामं पूर्ण करु शकता.

मकर- व्यापाराच्या दृष्टीने एखादा लहानसा प्रवासही फायद्याचा ठरेल. नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नोकरीत प्रगती करण्याची संधी आहे. कोणतंही काम विचार करुनच करा. जुन्या गोष्टींमध्ये रमाल.

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. जुन्या मित्रांची मदत होईल. मन प्रसन्न असेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाची साथ मिळेल. 

मीन- काम करण्याच्या पद्धतीत काही बदल घडतील. नोकरी आणि व्यवसायात मन रमेल. मतभेद होतील. काही व्यक्ती तुमच्या मेहनतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच काम करा. तुमच्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील.