मुंबई : नक्षत्र कायम आपल्या वेळेत बदलत असतात. या नक्षत्रांच्या आपल्या जीवनावर चांगला/वाईट असा परिणाम होत असतो. जाणून घ्या काय आहे आजचे तुमचे भविष्य
मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली काम आज पूर्ण होऊ शकतात. परिवाराशी संबंध सुधारू शकतात. तसेच आज आपली प्रतिमा सुधारण्याची संधी मिळू शकते. विचार केलेली सर्व काम आज पूर्ण होऊ शकतात. आजचा दिवस हा उत्साहाने भरलेला असणार आहे. कुटुंबाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. घरच्या गोष्टींमध्ये गुंतून राहू शकाल.
वृषभ - कामाधंद्यात व्यस्त राहाल. मेहनत करून आज चांगले पैसे कमवाल. अर्धवट राहिलेली सर्व काम पूर्ण होतील. नवीन संबंध जोडण्याची शक्यता आहे. पुढे जाण्याकरता तुम्हाला तुमच्या जीवनात काही बदल करावा लागेल. अविवाहित लोकांना रोमान्सचे क्षण मिळतील.
मिथुन - घाईत कोणतीच काम करू नका. पैशांची कमतरता जाणवेल. नोकरी आणि व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असेल.
कर्क - नोकरीमध्ये त्रास होऊ शकतो. दररोजच्या कामात अडचणी येऊ शकतात. हट्ट कराल तर वाद होण्याची दाट शक्यता आहे. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. अचानक डोक्याला त्रास होईल. काही गोष्टीत कुणाचीच मदत मिळणार नाही.
सिंह - कुटुंबात सुख-शांती राहिल. कामाच्या ठिकाणी थोडी तडजोड करावी लागेल. सामाजिक ठिकाणी सन्मान मिळेल. आज चांगल्या मित्राची भेट होऊ शकते. ऑफिसमध्ये आज कुणी तुम्हाला मदत करेल. रोमान्सचा चांगला क्षण आज घालवाल.
कन्या - कामाचा व्याप वाढेल. कर्मचाऱ्याकडून सहयोग मिळेल. आजच्या दिवशी खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही काळ सुट्टी मिळेल. सर्वाधिक त्रास आज कमी होईल. ज्या कामांना तुम्ही अर्धवट सोडलं ती आज पूर्ण होती.
तूळ - नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. उन्नतीकरता तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम कराल. जोडीदाराकडून खास प्रेम मिळेल.
वृश्चिक - व्यवसायात कमी फायदा होईल. कामात ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता. कोणतंही नवीन काम सुरू करू नका. तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा खडतर असेल. आज तुमचं मन फालतू कामांमध्ये जास्त असेल.
धनू - आजचा दिवस खूप चांगला असेल. विचार करून निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती बदलण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आज तुमचं महत्व वाढेल. प्रेमसंबंधांना आजचा दिवस चांगला आहे.
मकर - नवीन व्यवहार आज होऊ शकतात. दिवसाची सुरूवात चांगली नसेल. मनात नसताना देखील पैसे खर्च होतील. आजच्या दिवसाचं प्लानिंग खासगी ठेवा कुणाशी शेअर करू नका. नातेवाईकांमध्ये तणावाचं वातावरण असेल.
कुंभ - आर्थिक तंगी आज संपेल. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. चांगल्या लोकांच्या संगतीचा आज फायदा होईल. मुलांकडून आज चांगली गोष्ट ऐकायला मिळेल. आज कोणता तरी महत्वाचा निर्णय घ्याल.
मीन - आज व्यवसायात महत्वाचा निर्णय घेऊ नका. महागड्या गोष्टींची खरेदी करा. नवीन आणि मोठा निर्णय घेऊ शकतात. पैसे खर्च करण्यात थोडी चतुराई वापरावी लागेल.