आजचे राशिभविष्य | शनिवार | 2 मार्च 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 2, 2019, 10:07 AM IST
आजचे राशिभविष्य | शनिवार | 2 मार्च 2019  title=

मेष : काही नवे अनुभव येतील. काही समस्या सुटण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे म्हणणे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न कराल. दुसऱ्यांचे सांगणेही ऐकून घ्याल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती आणि कामातून शिकण्याचा प्रयत्न कराल. पारिवारीक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. 

वृषभ :  तुमच्यासाठी वेळ चांगला असेल. पैशांशी संबंधित प्रकरणावर तुमचे लक्ष जाईल. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास तुम्ही तयार असाल. नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल. आज महत्वपूर्ण कामात तुमचे योगदान महत्त्वाचे असेल. जुन्या नुकसानाची भरपाई होऊ शकेल. आज मोकळे होऊन काम करा. 

मिथून : आज स्वत: च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांशी प्रकरणात चांगल्या ऑफर मिळतील. यावर गांभीर्याने विचार करा. ऑफिस आणि व्यवसायात दुसऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवाल. कोणत्या तरी ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहाल आणि ते मिळतील. जमीन जागेच्या प्रकरणात फायदा होण्याचे योग आहेत. महिलांसाठी दिवस चांगला असेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. 

कर्क : लोकांशी संबंध वाढवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी संबधी चांगली बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधी कोणते तरी गुपित तुम्हाला आज समजेल. तुम्ही ठेवलेल्या प्रस्तावावर लोकं विचार करतील. कामकाज आणि करियरमध्ये तुम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळतील. जवळच्या लोकांशी नाती घट्ट होतील. अचानक धन लाभ झाल्याने खुश व्हाल. परिवारात वातावरण चांगले असेल. व्यवसायात प्रगती कराल. 

सिंह : आपल्या क्षेत्रात दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. आज तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी घर-परिवारातील लोकांच्या संपर्कात रहाल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी येतील. जास्त काम करण्याची संधी मिळेल. कोणते तरी पार्ट टाईम काम कराल. रोमांस आणि नात्याच्या बाबतीत स्थिती पहिल्यापेक्षा ठिक असेल. मांगळीक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिेळेल. 

कन्या : तुमच्यासाठी वेळ चांगला आहे. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील. आज तुम्हाला कोणत्या तरी खास व्यक्तीचा सल्ला मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही सक्रिय असाल. तुमची जास्तीत जास्त प्रकरण सुटू शकतील. विश्वासाचील व्यक्तींशी तुमच्या मनातील गोष्टी शेअर कराल. समस्यांचे समाधान लवकर मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या तरी बुजुर्ग व्यक्तीची मदत कराल. 

तूळ : कोणत्या तरी खास कामाला घेऊन तुम्ही उत्साही असाल. चांगला अनुभव मिळेल. चांगल्या लोकांशी ओळखी होतील. ज्यांचा भविष्यात  तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात केलेला करार तुमच्या फायद्याचा ठरेल. तुमचे म्हणणे दुसऱ्यांना समजावण्यात यशस्वी व्हाल. जे काम करण्याचा विचार गेले अनेक दिवस करत होता ते आता कराल. 

वृश्चिक : काही गोष्टी चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असेल. एकट्यानेच सर्व काम करण्याची ईच्छा तुमच्या मनात येईल. पैशांशी संबधित संधी येतील. वेळ तुमच्यासोबत असेल. कोणत्या खास कामात तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित असाल. संधीचा फायदा घ्याल. 

धनु : काही गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. तुम्हाला मदत मिळेल. नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक बाबतीत उत्तर असेल. एकट्यानेच सर्व काम कराल. लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील. पैशाशी संबंधित संधी तुम्हाला मिळतील. संधीचा फायदा घ्याल. 

मकर : वेळ मिळाला तर आराम करा. काही योजनांवर काम केलात पैशांशी स्थिती सुधारेल. जोडीदारासाठी छोटे-मोठे गिफ्ट घ्याल. खासगी अडचणींतून बाहेर पडाल. थोडा विचार आणि चर्चा कराल. करियरमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. नव्या सुरूवातीसाठी दिवस चांगला असेल. व्यवसायात यश मिळेल.

कुंभ : कायदेशीर प्रकरणात चांगली माहिती मिेळेल.मित्रांसोबत कामाचे चांगले प्लानिंग कराल. लोकांशी ताळमेळ साधाल आणि नव्या ओळखी कराल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. ऑफिमसमध्ये लोक तुमचे कौतूक करतील. समाज आणि परिवारात सन्मान मिळेल.

मीन : आपले विचार स्पष्ट ठेवा. ऑफिस आणि व्यवसायातील कामात यश मिळेल. थोडे प्रयत्न केलात तर खास व्यक्तीला प्रभावित कराल. कोणत्या तरी विश्वासातील व्यक्तीच्या मदतीने कोणते तरी काम कराल. कोणाशी तरी अचानक झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.