close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | रविवार | २५ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 25, 2019, 09:30 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | २५ ऑगस्ट २०१९

मेष- आज तुम्हाला स्वत:ची किंमत कळेल. दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा प्रयत्न करा. जबाबदाऱ्या पार पाडा. एकामागोमाग एक कामं सुरुच राहतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची चिन्हं आहेत. 

वृषभ- भावनांमध्ये चढ- उतार जाणवतील. जीवनातही बरेच बदल होतील. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. जुन्या अडचणी दूर होतील. तुम्ही आखलेले बेत फायद्याचे ठरतील. 

मिथुन- आर्थिक बाबातीत तुमचं नुकसान होणार नाही. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणाच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे तुम्हाला कळेल. व्यापाराच्या बाबतीत यशस्वी व्हाल. खर्च कमी करण्यावर भर द्या. अडकलेली कामं पूर्ण होतील. 

कर्क - अचानक धनलाभ किंवा एखाद्या मोठ्या योजनेचा फायदा होईल. तुमची अपूर्ण कामंही पूर्ण होतील. आज घेतलेल्या निर्णयांचा परिणाम फार काळ दिसेल. एखादी फायद्याची व्यक्ती अचानक भेटेल. 

सिंह- एखाद्या व्यक्तीसोबत संबंध सुधारण्याची चिन्हं आहेत. आत्मविश्वास ठेवा. सवयी सुधारा. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे. 

कन्या- एखादं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. आज भावनात्मक पद्धतीने विचार कराल. व्यापार किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवासयोग संभवतो. साथीदाराची पूर्ण साथ मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ- दुसऱ्यांच्या सांगण्यावरून एखाद्या कामाचं नेतृत्व केलं तर आजचा दिवस चांगला आहे. कामाचा व्याप वाढेल. जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळ तुम्हाला फायदाच होणार आहे. शुभकार्यांमध्ये सहभागी व्हाल. 

वृश्चिक- कमीत कमी वेळात जास्तं काम पूर्ण कराल. व्यापारात फायदा होणार आहे. जमिनीच्या मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय़ घ्याल. नशीबाची साथ मिळणार आहे. 

धनु- कुटुंबाच्या मदतीने काही महत्त्वाची कामं पूर्ण कराल. धनलाब होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि कामाच्या बाबतीत तणाव कमी होतील. पुढे जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. 

मकर- हाताशी जास्त वेळ ठेवा. पूर्ण दिवस कामाच्या व्यापात जाईल. इतरांकडून तुमची प्रशंसा होईल. स्पष्टपणे तुमचं मत मांडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामांवर इतरांचं लक्ष असेल. परिस्थिती तुमच्या कलाने आहे. 

कुंभ- कामाच्या निमित्ताने प्रशंसा होणार आहे. साथीदाराची मदत आणि फायदा मिळेल. खर्च आणि गुंतवणूकीचे निर्णय घ्या. दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. 

मीन- इतरांच्या मदतीच्या बळावर तुमची कामं पूर्ण कराल. न्यायालयीन आणि कायदेशीर कामं पूर्ण होतील. अडकलेली कामंही पूर्णत्वास जातील. वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी ठराल.