आजचे राशीभविष्य | शनिवार | २४ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल.

Updated: Aug 24, 2019, 08:00 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | २४ ऑगस्ट २०१९ title=

मेष- दैनंदिन कामे आटोपती घ्या, नवी जबाबदारी स्वीकारावी लागेल. दिवसभरात कामात व्यग्र राहाल. नवीन लोकांच्या संपर्कात याल, उर्जा वाढेल. राजकीय व्यक्तींना एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल.
 
 वृषभ- भावनिक चढ-उतार अनुभवायला मिळतील. कोणत्याही गोष्टीची फार चिंता करत बसू नका. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. बऱ्याच काळापासून सतावत असलेली समस्या संपेल. एखाची सुवार्ता कानावर पडण्याची शक्यता.
 
 मिथून- अचानक धनलाभ संभवतो. लोकांच्या मनातील गोष्टी ओळखाल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. व्यवसायात मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाची प्रशंसा होईल.
 
 कर्क- बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचा योग संभवतो. 
 
 सिंह- नातेसंबंधात सुधारणा होऊ शकतात. आत्मविश्वासाने काम करा. कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास धरू नका. एखादी जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 
 
 कन्या- वाहनखरेदीचा योग संभवतो. भावनिक होऊन विचार कराल. व्यवहार आणि नोकरीच्यानिमित्ताने प्रवासाचा योग संभवतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 
 
 तूळ- एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास अधिक फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल, अधिक मेहनत करावी लागेल. नव्या गाठीभेटी होतील, नव्या गोष्टी शिकायला मिळतील. 
 
 वृश्चिक- कामे पटापट उरकरण्याचा प्रयत्न कराल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. रोमँटिक क्षण अनुभवायला मिळतील. 
 
 धनु- कौटुंबिक सहकार्यामुळे कामे मार्गी लागतील. धनलाभ संभवतो. नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होतील. प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. 
 
 मकर- आजचा दिवस कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे मांडा. 
 
 कुंभ- कामकाजामुळे सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करण्यासाठी चांगला दिवस. 

मीन- कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. कोर्ट-कचेरीचे प्रकरणे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.