आजचे राशीभविष्य | गुरुवार | २ जानेवारी २०२०

'या' राशीच्या व्यक्तींनी कोणवरही लगेच विश्वास ठेऊ नये

Updated: Jan 2, 2020, 08:56 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | २ जानेवारी २०२०

मेष - काही कामात अडचणी येऊ शकतात. मेहनत अधिक करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. पण विचार करुनच निर्णय घ्या. कोणत्याही कामात घाई करु नका. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा. 

वृषभ - व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदारांची बढती होऊ शकते. सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. कामाचं टेन्शन कमी होऊ शकतं. चांगल्या संधी मिळू शकतात. 

मिथुन - सक्रीय राहाल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराची मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. उत्साही राहाल. तब्येत सुधारेल.

कर्क - ऑफिसमध्ये इतरांना प्रभावित करु शकता. नशिबाची साथ मिळेल. अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. सांभाळून राहा.

सिंह - अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायात सावध राहा. घाई-गडबड करु नका. व्यवसायात अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो. 

कन्या - योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीत सुधारणा होईल. 

तुळ - रखडलेली कामं पूर्ण होतील. काही लोक तुमच्या कामाचा विरोध करु शकता. नवीन, वेगळं करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची मदत मिळेल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे. 

वृश्चिक - व्यवसायात फायद्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. जुन्या समस्या संपतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. तब्येतीची काळजी घ्या.

धनु - नोकरीत अडथळे येऊ शकतात. व्यावसायिकांनी सावध राहा. वायफळ गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ शकतो. कामासाठी बाहेर जाऊ शकता. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.

मकर - उत्साह वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तब्येतीसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वादाची शक्यता आहे. व्यवसायासंबंधी नवीन कल्पना येऊ शकतात. कोणवरही लगेच विश्वास ठेऊ नका. 

कुंभ - दिवस चांगला आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत होऊ शकते. चांगले बदल होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीची काळजी घ्या. 

मीन - जोडीदाराची साथ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. कोणतीही गोष्ट बोलताना सावधतेने बोला. हवामान बदलामुळे त्रास होऊ शकतो. सावध राहा. काळजी घ्या.