आजचे राशीभविष्य | सोमवार | ५ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 5, 2019, 08:55 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | ५ ऑगस्ट २०१९ title=

मेष- नवं कार्यालय किंवा एखादं दुकान खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरी आणि व्यापार करणारे योग्य दिशेने वाटचाल करतील. कामकाज सुधारण्यावर लक्ष द्या. प्रेमसंबंध आणखी दृढ होतील. कोणत्याही बाबतीत भावुक होऊ नका. 

वृषभ- अजचा दिवस थकवणारा असेल. मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत कोणतीही भीती मनात ठेवू नका. कोणा एका खास व्यक्तीविषयी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळेल. गरजेमुसार पैसे खर्च करा. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

मिथुन- व्यवसायामध्ये मित्रांची मदत मिळेल. दैनंदिन कामांत मन रमेल. अपूर्ण कामं मार्गी लावाल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पण, जुन्या गोष्टी विसराल तेव्हाच या गोष्टी शक्य होतील. 

कर्क- दैनंदिन कामांत मन रमणार नाही. मनात अशा काही गोष्टी घर करतील ज्यामुळे तुम्हाला दु:ख होईल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह- कामाच्या ठिकाणी नको त्या व्यापापासून दूर राहा. वरिष्ठ तुमच्यापासून प्रभावित होतील. सहकाऱ्यांची साथ मिळेल. एकाद्या प्रवासाचा योग आहे. काही बाबतीत तडजोड करावी लागू शकते. नवे बेत आखा. 

कन्या- कामाच्या ठिकाणी जास्त गुंतागुंत असेल. चांगल्या परिणामांसाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास सावधगिरी बाळगा. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

तुळ- व्यवसायामध्ये फायदे होतील. जास्त मेहनत करावी लागू शकते. इतरांची मदत करा, फायदाच होणार आहे. नवे बेत आखण्याची चिन्हं आहेत. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीच बेजबाबदारपणा करु नका. 

वृश्चिक- जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाचा व्याप वाढलेला असेल. जुन्या वादांवर लक्ष केंद्रीत करु नका. प्रेम व्यक्त करण्यात संकोचलेपणा नको. वाहन चालवतेवेळी सावधगिरी बाळगा. करिअरच्या बाबतीत गांभीर्याने विचार कराल. साथीदाराच्या भावनांचा आदर ठेवा. 

धनु- दिवसभर व्यग्र असाल. वरिष्ठ तुमचं म्हणणं ऐकतील. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यापार चांगला चालेल. आरोग्य सुधारेल. पती- पत्नीचं नातं आणखी दृढ होईल. 

मकर- आज तुमच्या कामाचा व्याप वाढेल. एखादी तणावाची गोष्ट आज नाहीशी होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा पूर्ण प्रय़त्न कराल. 

कुंभ- वेळ तुमच्या हातात आहे. व्यापारामध्ये प्रगतीचा योग आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी मिळेल. वरिष्ठांशी असणारे संबंध सुधारतील. आज इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. 

मीन- व्यापारामध्ये फायदा तुलनेने कमी होईल. तणावाच्य़ा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अचानक जुने मित्र भेटतील. जडजोड करण्यासाठी सज्ज राहा.