आजचे राशीभविष्य | सोमवार | ८ जुलै २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 8, 2019, 08:31 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | ८ जुलै २०१९ title=

मेष- अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होती. पारिवारीक संबंध दृढ होतील. मित्र आणि भावंडांकडून मदत होईल. नवीन कामांना सुरुवात कराल. विचारात असणारी कामंही मार्गी लागतील. संपत्तीच्या कामांमध्ये लक्ष द्या. करार, व्यवहारांमध्ये चांगलं यश मिळेल. आजचा दिवस हा कुटुंब, खासगी आयुष्य आणि पैसे याभोवतीच व्यतीत होईल. साथीदाराला वेळ द्या. तब्येतीची काळजी घ्या. 

वृषभ- व्यवसायात व्यस्त असाल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. नकारात्मक गोष्टींमध्ये अडकलात तर मोठ्या संधीला मुकाल. आज कोणताच निर्मय घेऊ नका आणि काहीच निकाली काढू नका. गोंधळण्याची शक्यता आहे. दिवसभरात थोडी सावधगिरी बाळगा. विचार करुनच बोला. साथीदारासोबत बाहन चालवतेवेळी काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. 

मिथुन- घाई करुन कोणता निर्णय घेऊ नका. पैशांमुळे स्थिती चिंताजनक होईल.  नवी काम आणि व्यवसायातील संधी समोर येतील. संकटांशी दोन हात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विचार केलेल्या कामांना सुरुवात करा, या कामांची लवकरच पूर्तता होईल. दैनंदिन कामंही सुरळीत पार पडतील. समस्या निकाली निघतील. 

कर्क- नोकरीत अडचणी येऊ शकतात. नेहमीच्या कामात जोखीम उचलावी लागेल. हट्ट केलात तर वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतील. कोणत्याच बाबतीत बेजबाबदारपणा दाखवू नका. कामं पूर्ण होण्यास दिरंगाई होईल. मेहनत करण्याची गरज. तब्येतीकडे लक्ष द्या. 

सिंह- परिवारात सुख शांती वाढेल. कार्यक्षेत्रात समजुतदारी दाखवाल. विचारात असणारी कामं पूर्ण होणार नाहीत. अनेक विचारांमध्ये तुम्ही गुतंलेले राहाल. पैसे सांभाळून वापरा. मनात कोणतीतरी गोष्ट घर करुन राहील. आज कोणताच बेत आखू नका. ताटकळलेली कामं पूर्ण करा. सहसा कामात तुमचं लक्ष लागणार नाही. 

कन्या- व्यवसाय वाढेल. खालच्या स्तराच्या कर्मचाऱ्यांची मदत मिळेल. व्यवसायामध्ये काही नवे बेत आखू शकता. साथीदाराची सोबत मिळेल, मदत होईल. विचारात असणारी कामं पूर्ण होतील. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. तब्येत सुधारेल. मन प्रसन्न राहील. 

तुळ-  नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही काम पूर्ण करु शकता. कामात मन लागेल. अचानक नव्या संधी तुमच्यासमोर येतील. साथीदाराकडून अनपेक्षित सुखद धक्का मिळेल. 

वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. कोणते नवे काम सुरु करु नका. द्विधा मनस्थिती वाढेल. अनपेक्षित नुकसानासाठी तयार राहा. कामाच्या क्षेत्रात अडचणी निर्माण होतील. दुटप्पी भूमिका घेऊच नका. तब्येतीत चढ-उतार होण्यीची शक्यता. 

धनू- वैवाहित जीवनात सुख मिळेल. काही वाद हे विनम्रता आणि सामंजस्याने निकाली काढाल. दैनंदिन कामांतून फायदा होईल. कर्ज घेण्याचा निर्णय घ्याल. मोठ्या अडचणी दूर होण्याची शक्यता. नव्या लोकांना भेटाल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मकर- दिवसभर सावध राहा. काही व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. काही जुन्या गोष्टी तुम्हाला सतावतील. महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. कामात मन लागणार नाही. 

कुंभ- कामाच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. तणाव कमी होमार. आखलेले बेत यशस्वी होतील. पुढचे बेत आखणं तुमच्यासाठी आज अधिक सोपं होणार आहे. ताटकळलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. योग्यता आणि अनुभवाच्या मदतीने काम करा. समस्यांवर तोडगा निघेल. तब्येतीची मात्र काळजी घ्या. 

मीन- व्यवसायात काहीतरी नवं करण्याच्या नादात अडचणी वाढण्याची शक्यता. कामात मन रुळणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत घाई करु नका. कामं निकाली निघाली नाही तर चिंता करु नका.