आजचे राशीभविष्य | शुक्रवार | 15 फेब्रुवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 15, 2019, 08:24 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | 15 फेब्रुवारी 2019 title=

मेष : कोणालाही मदत करण्याची सुरुवात तुम्ही कराल. काही लोकांची उदारता तुमचे काम पूर्ण करण्यास मदत करेल. अशा लोकांपासून तुम्ही प्रभावित व्हाल. तुम्हाला नवा अनुभव मिळू शकतो. नव्या जागी प्रवास होऊ शकतो. तुमच्या कामकाजात काही बदल होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात काही बदल संभावतात.

वृषभ : नशिबाची साथ मिळेल. कुठूनतरी पैसे मिळतील. प्रेमी किंवा जोडीदारासोबत वेळ घालवा. अविवाहीत लोकांना लग्नाची मागणी येईल. लव मॅरेज करणाऱ्या लोकांना परिवाराची मदत मिळेल. व्यवसायात पार्टनरकडून धन लाभ होईल. व्यवसायात फायदा होईल. नव्या योजना आखाल. नोकरीच्या जागेमध्ये बदल होण्याचा योग आहे. 

मिथून : पैशांच्या प्रकरणी वेळेवर मदत मिळेल. नोकरीमध्ये बढतीसाठी प्रयत्न करत असाल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. काही नव्या ओळखी होण्याची शक्यता आहे. नोकरीची नवी संधी मिळेल. प्रेम संबंध आणखी घट्ट होतील. कोणाची मदत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्यांची मदत कराल तितकीच मदत मिळेल. 

कर्क : चांगल्या माणसांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. मोठ्या योजना आणि विचारांवर गप्पा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही संधीचा फायदा उठवण्यास वेळ घालवू नका. विशेषत: नोकरीची जी संधी मिळेल त्याकडे लक्ष द्या. नवे प्लानिंग सुरू करु शकता. यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यांच्या बाबतीत काही खास प्रश्नांची उत्तरे मिळतील. सर्वांसोबत सहकार्याने वागा. वैवाहीक आयुष्य ठिक राहील. 

सिंह : आज तुम्ही सकारात्मक पद्धतीने जास्त विचार कराल. आव्हानांचे एक सत्र संपू शकते. धर्म-कर्माची आवड आणखी वाढू शकते. पैशांच्या प्रकरणी चांगल्या माणसांचा सल्ला घ्या. परिवारासोबत राहण्यास वेळ मिळेल. कोणत्या तरी प्रकारचे रचनात्मक विचार मनात येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. 

कन्या : करियरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी योजना आखाल. ऑफिमध्ये काम जास्त असेल पण तुम्ही वाटून घ्याल आणि त्यातून सहज बाहेर पडाल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. परिवारात काही आनंदाचे समारंभ पार पडतील, ज्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुम्ही आनंदी राहाल. व्यवसाय वाढण्यास मदत होईल. व्यवसायात मुलांचीही मदत तुम्हाला होईल. वैवाहीक आयुष्य सुखात राहील. 

तूळ : नवी जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. हुशारीने काम पूर्ण कराल. चांगल्या कामांमध्ये तुम्हाला मदत मिळू शकेल. खरेदी करताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. याने तुम्हालाच फायदा होईल. जबाबदारीमुध्ये तुम्ही व्यस्त असाल. यातून तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल. परिवारात शांती असेल. पैशांची स्थिती सुधारेल.

वृश्चिक : मित्रांशी भेटी होतील आणि मदत मिळेल. पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. नोकरी किंवा व्यवसायात काही अशी कामे होतील ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. अडकलेला पैसा मिळेल. स्वत: ला वेळ देण्याचा प्रयत्न कराल. जबाबदारीवर लक्ष द्या. चांगल्या आवडींमुळे धन लाभ होण्याची शक्यता असते. मित्रांशी ओळखी होतील. 

धनु : तुम्ही तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्या. नोकरी किंवा व्यवसायात फायदा होणाऱ्या ऑफर मिळू शकतील. नव्या योजनांवर विचार करण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराची मदत मिळेल. तुमचे सकारात्मक वागणे लोकांना आवडेल. पैसे कमावण्याची नवा मार्ग शोधून काढाल. दुसऱ्यांच्या मदतीने कोणते तरी मोठे काम वेळेआधीच होईल. शैक्षणिक आणि कायदेशीर कामांमध्ये यश मिळेल. 

मकर : ऑफिस आणि व्यवसायात तुमच्या बद्दलचा आदर वाढेल. कोणता नवा प्रकल्प, गुंतवणूक किंवा नोकरीमध्ये मोठा निर्णय होऊ शकतो. जो काही निर्णय असेल तो तुमच्या बाजूने असेल. अचानक करियर संदर्भात चांगल्या ऑफर मिळू शकतील. ऑफिसचे खास काम तुम्ही नव्या पद्धतीने कराल. तुमच्या कामाच्या जोरावर लोकांना इम्प्रेस करु शकाल. दुसऱ्यांच्या अनुभवामुळे तुमच्या डोक्यात अनेक प्रकारच्या प्लानिंग सुरू होतील. 

कुंभ : स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल. सोबत घेऊन चालण्याचे विचार तुम्हाल मदत करतील. व्यवसायामध्ये आजुबाजूच्या लोकांची तुम्हाला मदत होईल. कोणती तरी मोठी ऑफर मिळेल. पैशांचे प्रकरण असेल तर ते उरकून टाका. आज व्यवसायात कोणती तरी मोठी योजना आखाल. वैवाहीक आयुष्य सुखात असेल. 

मीन : अधिकतर प्रकरणी दिवस चांगला असेल. कठीण काम देखील सहज कराल. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी तुम्हाला मिळू शकतील. ज्या लोकांच्या भेटी घ्याल त्या तुम्हाला मदत करणाऱ्या ठरतील. पैशांच्या स्थितीत सुधार पाहायला मिळेल. इनकम वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यवसायात फायदा होईल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.