आजचे राशीभविष्य | मंगळवार | १२ मार्च २०१९

असा असेल आजचा दिवस 

Updated: Mar 12, 2019, 08:10 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | १२ मार्च २०१९ title=

मेष- नवे अनुभव मिळतील. अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत त्यात यशस्वी ठराल. आज तुमची मतं ठामपणे समोर मांडण्यात यशस्वी ठराल. इतरांचं म्हणणंही तितक्याच चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक संबंधांसाठी दिवस चांगला आहे. 

वृषभ- तुमच्यासाठी काळ चांगला आहे. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा. प्रत्येक आव्हानासाठी तयार राहा. काही नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. काही अडचणीच्या जुन्या गोष्टींचा फायदा होईल. भावंड आणि मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- आज स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांच्या बाबतीच काही नवे प्रस्ताव समोर येतील. पण, यावर गांभीर्याने विचार करा. नोकरी आणि व्यवसायामध्ये इतरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मिळेल. करिअर, संपर्क आणि स्वत:च्या प्रतिमेसाठी आजचा दिवस चांगला आहे. जमिन, संपत्तीच्या बाबतीत फायदा होण्याची चिन्हं आहेत. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता. 

कर्क- इतरांसोबतच्या संबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरच्या बाबतीत काही गोष्टी अगदी स्पष्ट होतील. कार्यक्षेत्राशी निगडीत महत्त्वाची माहिती मिळेल. जबाबदारी पूर्ण करण्यावर लक्ष द्या. जवळच्या लोकांशी नाती आणखी दृढ कराल. अचानक होणारा धनलाभ आनंददायी ठरेल. 

सिंह- तुमच्या क्षेत्रात इतरांच्या पुढे जाण्यासाठी उत्साही असाल. कितीही व्यग्र असाल तरीही कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ ठेवा. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये प्रगती होण्याची चिन्हं. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. शुभकार्यांमध्ये सहभागी व्हाल. 

कन्या- शुभ काळ सुरू आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. आज कोणा एका व्यक्तीचा सल्ला किंवा मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी बऱ्यापैकी सक्रिय असाल. अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सहजपणे सोडवाल. विश्वासार्ह व्यक्चीसोबत काही गोष्टी शेअर कराल. कामं वेळच्या वेळी पूर्ण होतील. 

तुळ- कोणा एका महत्त्वाच्या कामासाठी तुमचा उत्साह शिगेला पोहोचलेला असेल. नवे अनुभव मिळतील. काही खास व्यक्तींची भेट घडेल ज्यांचा फायदा तुमच्या करिअरमध्ये होईल. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे करार होतील. धार्मिक कार्यांमध्ये स्वारस्य दाखवाल. 

वृश्चिक- बऱ्याच बाबतीत आणि गोष्टी समजून घेताना इतरांची मदत मिळेल. नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेल. एकट्यानेच सर्व कामं करण्याचा प्रयत्न असेल. आज तुम्ही इतरांवर प्रभाव पाडाल. संधीचा फायदा घ्याल. 

धनु- नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं, प्रश्नाचं उत्तर असेल. आत्मविश्वासाची कमतरता नसेल. इतरांवर तुमचा प्रभाव असेल. आर्थिक बाबतीत नव्या संधी मिळतील. वेळ तुमच्या पारड्यात आहे. संधीचा फायदा घेण्यात यशस्वी ठराल. वादांवर तोडगा निघेल. 

मकर- संधी मिळाल्यास विश्रांती करा. कोणती नवी योजना आखत असाल तर त्यात आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हं आहेत. साथीदाराला एखादी भेटवस्तू देऊ शकता. विचारपूर्वक चर्चा करुन काही समस्यांवर तोडगा काढाल. करिअरमध्ये फायदा होण्याची चिन्हं आहेत. नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस. व्यवसायात यश मिळेल. 

कुंभ- कायदेशीर बाबींमध्ये चांगली बातमी मिळेल. मित्रांसमवेत कामाच्या योजन आखाल. इतरांशी मेळ साधण्याचा प्रयत्न कराल. लवकरच प्रवासयोग संभाव्य. जुन्या गुंतवणूकीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. समाज आणि कुटुंबात प्रतिष्ठा मिळण्याचा योग. वरिष्ठ तुमच्यामुळे आनंदीत असतील. 

मीन- विचार ठामपणे मांडा. कामाची पद्धत पाहून इतर व्यक्ती त्यांच्या मनातील काही गोष्टी तुमच्यापुढे मांडतील. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतील यश मिळण्याचा दिवस आहे. प्रयत्न केल्याच कोणा एका खास व्यक्तीवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. आत्मविश्वास वाढलेला असेल.