Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग

Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ.   

Updated: Jan 21, 2023, 06:58 AM IST
Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग  title=
todays Panchang 21 january 2023 saturday shubh mahurat

Panchang, 21 january 2023 : आज शनिवार, (saturday) अनेकांसाठी सुट्टीचा दिवस. अर्थात काहीजण याला अपवादही असतील. आजच्या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये काही मंडळींनी सुट्टीचाच योग साधून काही शुभकार्य करण्याचं योजलं असेल. तर मग ही शुभकार्य नेमकी कोणत्या वेळेत उरकावी? ती नेमकी कधी करु नयेत याविषयीची माहिती तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला मिळेल आजच्या पंचांगातून. 

आजच्या दिवसाचे बहुतांश शुभ मुहूर्त आणि अशुभ काळ याच पंचांगामध्ये सांगण्यात आले आहेत. त्यामुळं तुम्हीही असं एखादं कार्य करु पाहताय, किंवा तुमच्या ओळखीत कुणी शुभकार्य करण्याचं ठरवलं असेल तर आधी मुहूर्त आणि सूर्योदर- सूर्यास्ताच्या वेळांवर नजर टाका. अनेकांसाठी या वेळा आणि हे मुहूर्त अनन्यसाधारण महत्त्वाचे असतात. आजचा दिवस चांगलाच आहे, पण तो आणखी चांगला करण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग. (todays Panchang 21 january 2023 saturday shubh mahurat)

आजचा वार - शनिवार 
तिथी- अमावस्या 
नक्षत्र - पूर्वाषाढा, उत्तराषाढा   
योग - हर्षण 
करण- चतुष्पाद 16.23 पर्यंत, नागा 02.25 पर्यंत 

हेसुद्धा वाचा : Horoscope 21 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभाच्या संधी मिळणार आहेत!

 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:14 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17.50 वाजता
चंद्रोदय -  आज चंद्रोदय नाही 
चंद्रास्त - 17.11 वाजता  
चंद्र रास- धनु 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 07:14 पासुन 07:56 पर्यंत, 07:56 पासुन 08:38 पर्यंत
कुलिक– 07:56 पासुन 08:38 पर्यंत
कंटक– 12:11 पासुन 12:53 पर्यंत
राहु काळ– 09:53 पासुन 11:12 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम– 13:36 पासुन 14:18 पर्यंत
गुलिक काळ– 07:14 पासुन 08:33 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:11 पासुन 12:53 पर्यंत
अमृत काळ - रात्री 12.56 ते 2.20 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 2.19 ते दुपारी 3.01 मिनिटं 

आजचं ताराबळ 
शतभिषा, स्वाति, रोहिणी, अश्विनी, मूल, भरणी, कृत्तिका, श्रवण, आर्द्रा, पूर्वा, मघा, फाल्गुनी, हस्त, अनुराधा

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)