Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश

Horoscope :  येत्या 6 दिवसात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूच्या चाली बदलणार आहेत. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 27 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल.

नेहा चौधरी | Updated: Dec 24, 2023, 08:18 AM IST
Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश  title=
Transit of 4 planets mangal budh shukra or mars venus mercury in next 6 days 6 zodiac people will get success with financial gain horoscope

Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या स्थिती बदलचा परिणाम 12 राशींवर पडतो. पुढील 6 दिवसांमध्ये शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूची स्थिती बदलणार आहे. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक, 27 डिसेंबरला मंगळ धनु राशीत, 28 डिसेंबरला बुधही वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. तर 31 डिसेंबरला गुरू थेट मेष राशीत जाणार आहे. मंगळ, बुध, बृहस्पति आणि शुक्र यांच्या हालचालीतील बदलामुळे सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम (Transit of 4 planets mangal budh shukra or mars venus mercury in next 6 days 6 zodiac people will get success with financial gain horoscope)

मेष

मन प्रसन्न राहणार असून आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायात सुधारणा होणार आहे. अनेक लाभाच्या संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. 

वृषभ

मनात चढ-उतार जाणवणार आहे. संयम राखण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायात बदल होण्याचे योग आहेत. जास्त मेहनत करावी लागणार आहे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून आर्थिक लाभ होणार आहे. 

मिथुन

मन शांत असलं तरीही आत्मसंयमी राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळणार आहे. आईकडून मदत मिळणार आहे. 

कर्क

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. मात्र अतिउत्साही होणे टाळा आणि स्वत:वर नियंत्रण ठेवा. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळणं हिताचं होईल. कुटुंबाकडून सहकार्य लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आर्थिक मदत मिळणार आहे. 

सिंह

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. मात्र शांत राहणे हिताचं ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. वडिलांचा सहवास मिळणार आहे. मनातील नकारात्मक विचार टाळा. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळणार आहे. 

कन्या

कुटुंबासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाणार आहात. प्रवासातून खर्च वाढणार आहे.आपल्या मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात वाढ होणार आहे. व्यवसायात मित्राकडून मदत मिळणार आहे. 

तूळ

मन प्रसन्न राहणार आहे. पूर्ण आत्मविश्वासही असणार आहे. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळणार आहे. कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे. तुम्हाला मित्राकडून सहकार्य मिळणार आहे. आजूबाजूला अधिक धावपळ होणार आहे.

वृश्चिक

बोलण्यात सौम्यता असेल, पण संयमाचा अभाव असणार आहे. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढणार आहे. 

धनु

मन अस्वस्थ राहणार असून संयमाचा अभाव असणार आहे. कुटुंबात अनावश्यक राग टाळा. मुलांच्या आरोग्याबाबत लक्ष द्या. मित्रांकडून सहकार्य मिळणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. 

मकर

आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य मिळणार आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बढतीची संधी मिळणार आहे. वाहनांच्या सोयी वाढणार आहे.

कुंभ

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात मात्पर शांत राहणं हिताचं ठरेल. जास्त राग टाळा. आपल्या मुलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात सुधारणा होणार आहे. उत्पन्न वाढीचे साधन गवसणार आहे. 

मीन

मन प्रसन्न राहणार आहे. पण मनावर नकारात्मक विचारांचाही परिणाम होणार आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य लाभणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)