मुंबई : मकर संक्रातीला तिळगूळ घ्या गोड बोला म्हणतात. याच मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्याचा परिणाम इतर राशींवरही होत असतो. 14 जानेवारी रोजी 3 अतिशय महत्त्वाचे ग्रह त्रिग्रही योग तयार करत आहेत. मकर राशीत शनीच्या राशीत ते हा योग तयार झाला आहे.
मकर राशीत शनी आणि बुध आधीपासूनच आहेत आणि आज सूर्यानेही या राशीत प्रवेश केला आहे. शनीच्या राशीत तयार होत असलेला त्रिग्रही योग 4 राशीच्या लोकांवर भारी पडणार आहे.
वृषभ (Taurus)- या राशीच्या लोकांसाठी त्रियोग चांगला राहणार नाही. कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आई-वडिलांसोबत नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही काळ आपल्याला जपून राहावं लागणार आहे.
मिथुन (Gemini)- या राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यावर या काळाचा वाईट परिणाम होईल. तुम्ही प्रवास करू शकता. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही अडचणी येतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
कन्या (Virgo)- गाडी जपून चालवावी. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक आव्हाने तुम्हाला त्रास देतील. घरातील सदस्याच्या आजारपणामुळे हॉस्पिटलला जावं लागू शकतं.
धनु (Sagittarius)- धनु राशीसाठी तणाव देणारा आहे. याशिवाय वाढलेल्या खर्चाचा जमा भांडवलावरही वाईट परिणाम होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)