Tulsi : या वेळी चुकूनही तोडू नयेत तुळशीचे पाने, जीवनावर होतो अशुभ परिणाम

तुळशीला हिंदू धर्मात लक्ष्मी मानले जाते. तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे.

Updated: Mar 25, 2022, 06:28 PM IST
Tulsi : या वेळी चुकूनही तोडू नयेत तुळशीचे पाने, जीवनावर होतो अशुभ परिणाम title=

Tulsi Tree : हिंदू धर्माला सनातन धर्माचा दर्जा देण्यात आला आहे. ज्यामध्ये वृक्ष, वनस्पती आणि प्राण्यांमध्येही दैवी शक्ती आहे असे मानले जाते. या सर्वांमध्ये तुळशीला अधिक महत्त्व आहे. कारण तुळशीला हिंदू धर्मात पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं. ज्यामुळेच ती घराघरात दिसते.

वास्तू आणि ज्योतिषाच्या दृष्टीकोनातूनही तुळशीला अतिशय शुभ वनस्पती मानले जाते. तुळशीच्या पूजेबाबत काही नियम आहेत.

आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांबद्दल असलेले काही नियम सांगणार आहोत.

१. तुळशीची पाने तोडायची असतील तर नखे वापरू नका, हात मारून किंवा लाकूड मारून पाने तोडू नका. तुळशीची पाने तोडताना नेहमी बोटांच्या टोकांचा वापर करा.
२. तुळशीची पाने तोडण्याआधी तुळशीमातेची प्रार्थना करून तिची परवानगी घेण्याचेही हिंदू धर्मात मान्यता आहे.
३. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला हात लावू नये. हे अपवित्र समजले जाते आणि मनुष्य पापाला बळी पडतो.
४. वाळलेली तुळस फेकून देण्याऐवजी पवित्र नदीत टाकावी.
५. सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत.
६. अमावस्या, द्वादशी आणि चतुर्दशीलाही तुळशीची पाने तोडू नयेत.
७. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि त्यात पाणीही अर्पण करू नये.
८. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी उपस्थित अन्नावर तुळशीची पाने ठेवावीत. यामुळे ग्रहणाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
९. शंकर आणि गणपतीला तुळशीची पाने अर्पण करू नयेत. पूजा करताना तुळशीची पाने नियमितपणे भगवान विष्णूला अर्पण करावीत. यामुळे शुभ परिणाम मिळतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x