Tulsi Plant Rules: चुकूनंही 'या' 5 जागी लावू नका तुळशीचं रोप!

वास्तुशास्त्रानुसार, 5 ठिकाणी तुळशीचे रोप लावणं वर्ज्य आहे. 

Updated: Aug 6, 2022, 08:59 AM IST
Tulsi Plant Rules: चुकूनंही 'या' 5 जागी लावू नका तुळशीचं रोप! title=

मुंबई : भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. ही वनस्पती दैवी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यात विविध रोगांना पराभूत करण्याची अलौकिक आयुर्वेदिक शक्ती देखील आहे. सनातन धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये क्वचितच असं कोणतेही घर असेल, ज्यामध्ये तुळशीचे रोप लावलेले नसेल. पण तुळशीचे रोप लावण्याचे काही खास नियम आहेत. 

वास्तुशास्त्रानुसार, 5 ठिकाणी तुळशीचे रोप लावणं वर्ज्य आहे. असं केल्याने माँ लक्ष्मीचा कोप होतो आणि कुटुंबातील सदस्यांना आयुष्यभर अडचणींचा सामना करावा लागतो. चला जाणून घेऊया घरात कोणच्या ठिकाणी तुळशीचं रोपं लावू नये.

भगवान शंकराच्या मूर्तीसोबत तुळस लावू नका

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप चुकूनही शिव आणि गणेशाची मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर लावू नये. असं मानलं जातं की, आपल्या मूर्तीसोबत तुळशीचं रोप लावल्याने भोलेनाथ भक्तांवर नाराज होतात, असं मानलं जातं. 

तळघरात लावू नये रोप

तुळशीचे रोप सर्व वनस्पतींमध्ये अत्यंत पवित्र मानलं जाते. ही वनस्पती कधीही जमिनीत लावू नये. त्याऐवजी, तुम्ही एखादं भांडं, बादली किंवा स्टँडमध्ये तुळस लावू शकता. तुळशीचं रोप चुकूनही तळघरात लावू नये.

घराच्या अंधाऱ्या भागात लावू नका

भारतीय शास्त्रांनुसार, तुळशीचं रोप नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागेवर लावावं. तुळस कधीही गडद ठिकाणी लावू नये. अंधारात लावलेली वनस्पती तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि विनाशाचं कारण बनते.

काटेरी झाडांजवळ तुळस लावू नये

तुळशीच्या रोपाला मां लक्ष्मीची प्रतिकृती मानली जाते, जी आपल्या भक्तांवर सतत आशीर्वाद देते. असं मानलं जातं, की तुळशीच्या रोपाजवळ काटेरी रोप कधीही लावू नये. असं केल्याने, वनस्पती सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक उर्जेचा वाहक बनते. 

गच्चीवर ठेऊ नये

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप विसरुनही गच्चीवर ठेवू नये. ज्या लोकांचा बुध ग्रह पैशाशी संबंधित आहे, त्यांनी याची विशेष काळजी घ्यावी. तुळशीचे रोप टेरेसवर ठेवल्याने आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)