Tulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल

Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात.  त्यामुळे तुम्ही ते करु शकता.

Updated: Feb 1, 2023, 08:54 AM IST
Tulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल   title=

Tulsi Vastu Tips For Money Problem: हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये तुळशीची वनस्पती अतिशय शुभ आणि धार्मिक मानली जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते. (Tulsi Vastu Tips) ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात सदैव सुख-समृद्धी असते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपली आर्थिक संकटे दूर करण्यात मदत करतात. (Money Problem News in Marathi) जाणून घ्या तुळशीचे उपाय.

तुळशीची पाने तिजोरीत ठेवा

जर तुम्ही अनेक काळापासून आर्थिक परिस्थितीशी सामना करत असाल आणि खूप प्रयत्न करुनही समस्या सुटत नसेल तर तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा, यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून लवकरच सुटका होईल. 

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा 

हिंदू धर्मात लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करते असे मानले जाते. त्यामुळे धनप्राप्तीसाठी उपाय करत असाल तर संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. 

शुक्रवारी हे काम करा

तुमच्यावरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी तुळशीच्या रोपाजवळ पीठ आणि तुपाचा दिवा लावल्यास त्याचा लाभ मिळतो. तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होतो. विशेषत: शुक्रवारी असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळू शकतात.

गंगेच्या पाण्यात पाने ठेवा

जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल, पैसा येतो पण थांबत नाही किंवा तुम्हाला एका किंवा दुसर्‍या समस्येने घेरले असेल तर गंगेच्या पाण्यात तुळशीची पाने ठेवा आणि घरभर ते पाणी शिंपडा. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते. 

'या' देवाला तुळशी अर्पण करा 

हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की भगवान विष्णूंना तुळशी आवडते, म्हणून भगवान विष्णूला तुळशी अर्पण करा. यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. विष्णूची पुजा करताना त्याला स्नान घातलाना तुळशीची पाने अवश्य घाला आणि हे पाणी आपल्या पाण्यात मिसळा. यामुळे तुमचे ग्रह दोष दूर होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)