Valentine Day, Prem Yog Love Marriage or Arranged Marriage : लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. घरच्यांची इच्छा असते आपल्या मुलांनी घरच्यांचा पसंतीने लग्न करावं. तर मुलांना लव्ह मॅरेज करायची इच्छा असते. खूप कमी तरुणाई आपलं नातं हे प्रेमविवाहपर्यंत (Love) नेतात. तर काहीचं कुठल्या ना कुठल्या कारणाने लग्न होतं नाही. आज व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला लग्नासाठी विचारणार आहेत. तर घरचे तुमच्या लग्नासाठी तयार होती का? तुमच्या नशिबात प्रेमविवाह आहे का? या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या कुंडलीत (Kundli) दडली आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीचे पाचवे घर प्रेम संबंधांबद्दल आहे. प्रेम जीवन कसे असेल, प्रेम संबंधात यश मिळेल की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे कुंडलीचे हे 5 वे घर पाहून मिळू शकतात. (Valentine Day 2023 Love Marriage or Arranged Marriage in your destiny What does your sya kundli rahu ketu shani upay marathi news)
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत 12 घरं असतात. या कुंडलीतील प्रत्येक घराचं स्वतःचे वेगळं आणि महत्त्वाचं स्थान असतं. प्रत्येक घरात कुठला ग्रह आहे. कुठल्या योग आहे हे ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. जर पाचव्या घराबद्दल बोलायचं झालं तर प्रेम, म्हणजेच लव्ह लाईफ आणि प्रेमाचं नातं या कुंडलीच्या घरातून कळतं. हे घर मुलांचा आणि शिक्षणाचही घर म्हणून ओळखलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार राहू-केतूला (Rahu Ketu) अशुभ ग्रहांच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय. असं मानलं जातं की जेव्हा राहू किंवा केतूचा पंचम भावावर अंक असतो तेव्हा प्रेम जीवनात अडचणी येतात. अशावेळी प्रेमी युगुलांना प्रेमात यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. कधीकधी अपयशाला सामोरं जावं लागू शकतं.
ज्योतिषशास्त्रानुसार शनि (Shani Dev), मंगळ आणि सूर्य यांना अशुभ ग्रहांच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय. जेव्हा हे ग्रह कुंडलीच्या पाचव्या भावात असतात तेव्हा त्या व्यक्तीला प्रेम संबंधांमध्ये अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं. या ग्रहांमुळे ब्रेकअप, किरकोळ भांडणं अशा समस्यांनाही सामोरं जावं लागेल. प्रेमविवाहातही हे ग्रह अडथळे निर्माण करतात.
आता अशावेळी काय करायचं तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. या मंत्रांचा जप केल्याने हे ग्रह शुभ बनू शकतात आणि येणारे अडथळे दूर होऊ शकतात. या मंत्रांची माळ दररोज जप करणे शुभ मानली जाते. तर तुम्हीही शुभ परिणामांसाठी या मंत्रांचा जप करा, प्रेमात यशस्वी होण्यासाठी तुमचं पाचवं घर मजबूत करा.
राहु मंत्र- ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:
केतू मंत्र- ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:
शनि मंत्र- ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः
मंगळाचा मंत्र- ॐ भौम भौमाय नमः
सूर्य मंत्र- ॐ सूर्याय नम:
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)