Weekly Love Horoscope 13 to 19 February : Valentine Day पासून आठवड्याची सुरुवात, पहा कोणत्या राशीला मिळणार प्रेम

Weekly Love Rasgifal 13 to 19 February 2023 : मंगळवारी 14 फेब्रुवारीला Valentine Day जगभरात साजरा केला जाणार आहे. मग या आठवड्यात तुमची लव्ह लाइफ कशी असेल जाणून घ्या.

Updated: Feb 12, 2023, 07:07 AM IST
 Weekly Love Horoscope 13 to 19 February : Valentine Day पासून आठवड्याची सुरुवात, पहा कोणत्या राशीला मिळणार प्रेम title=
valentine day 2023 valentine weekly love horoscope Weekly Love Rasgifal 13 to 19 February 2023 all zodiac in marathi

Weekly Love Rasgifal 13 to 19 February 2023 : ज्या दिवशीची प्रत्येक प्रेमींना आणि जोडीदारांना उत्सुकता होती. तो दिवस अवघ्या काही दिवसांवर आला आहे. जगभरात 14 फेब्रुवारीला Valentine Day साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस...ज्योतिषशास्त्रानुसार हा प्रेमाचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. या आठवड्याची सुरुवात सूर्य आणि शुक्राच्या राशी परिवर्तनाने होत आहे. म्हणून हा आठवडा तुमच्या लव्ह लाइफ आणि कौटुंबिक जीवनासाठी कसा राहील ते पाहूयात. (Weekly Horoscope in Marathi) 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. काही वेळा पार्टनरला सर्व काही सांगणे हानिकारक ठरू शकतं. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या प्रेम जीवनावर जितकं अधिक लक्ष केंद्रित कराल, तितकाच आनंद आणि सुसंवाद जीवनात राहील. या संपूर्ण आठवड्यात तुमचं लव्ह लाइफ रोमँटिक असेल. विवाहित लोक या आठवड्यात त्यांच्या जोडीदाराच्या सहवासात आनंददायी वेळ घालवतील. (valentine day 2023 valentine weekly love horoscope Weekly Love Rasgifal 13 to 19 February 2023 all zodiac in marathi)

वृषभ (Taurus)

या राशींच्या लोक या आठवड्यात आपल्या लव्ह लाइफ (Love life horoscope) संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल थोडे दु:खी होऊ शकता. आर्थिक बाबतीत चांगली पकड असलेल्या व्यक्तीमुळे परस्पर वैर निर्माण होऊ शकतं. संभाषणातून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी हुशारीने काम कराल, तरच नाते मजबूत होईल. वैवाहिक जीवनाशी संबंधित लोकांमध्ये परिस्थिती सामान्य राहील आणि प्रत्येकजण आपापली कामं करतील.

मिथुन (Gemini)

या राशीचे लोक या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या लव्ह लाइफबद्दल थोडे उदास राहतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदाराचं मन वळवण्याचा प्रयत्न कराल, तरच तुमच्या आयुष्यात आनंद आहे. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती सुधारेल आणि परस्पर प्रेम देखील दृढ होईल. तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात तुमच्या इच्छेनुसार बदल घडवून आणू शकता. विवाहित लोकांचे जोडीदारावरील प्रेम वाढेल.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांची लव्ह लाइफमध्ये सुखद काळ असेल शिवाय रोमँटिक असेल. या आठवड्यात तुमच्या जोडीदार तुमच्याकडे खूप लक्ष देईल. तुम्हाला जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरगुती सामानाची खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल. विवाहित लोक या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत काही महत्त्वाची चर्चा करतील, आनंददायी वेळ घालवाल.

सिंह (Leo)

या राशींच्या लोकांची लव्ह लाइफ आनंददायी असेल. शिवाय तुमच्या जीवनात रोमान्सच रोमान्स असेल. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत एखाद्या कार्यक्रमात जाऊ शकता आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकता. विवाहित लोक आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकतात.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफ खूप चांगली असणार आहे. अख्खा आठवडा आनंददायी जाईल. परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रभावित करू शकाल. पण आठवड्याच्या शेवटी, वडिलांच्या व्यक्तिमत्त्वावर अहंकाराचा संघर्ष वाढू शकतो आणि प्रेमसंबंध बिघडू शकतात. विवाहित लोक या आठवड्यात आपल्या जोडीदाराला घरगुती कामात मदत करतील.

तूळ (Libra)

सप्ताहाच्या सुरुवातीला तूळ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात अस्वस्थता जाणवेल आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत असाल आणि तुमच्या प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात. या आठवड्यात जोडीदारासोबत संयमी राहिल्यास चांगले परिणाम दिसून येतील. विवाहित लोक या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत कुठेतरी दुसरा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयमाने पुढे जाईल. प्रेम जीवनात भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल आणि एकमेकांना समजून घेऊन काम कराल. कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जोडीदाराचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रिय जोडीदारासोबत धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius)

या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप आनंदी असाल आणि रोमान्सने भरला आठवडा असेल. हा आठवडा परस्पर प्रेम दृढ करण्याचा आठवडा आहे. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या प्रेम जीवनात हा आठवडा शांततापूर्ण जाईल आणि परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही चांगली बातमी मिळू शकते. एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल आणि नात्यात गोडवा ठेवण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या शेवटी मन उदास होईल आणि परस्पर प्रेमात अस्वस्थता जाणवेल. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात वेळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेम वाढेल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी प्लॅनिंग मूडमध्ये असाल आणि आयुष्यात काही नाविन्यपूर्ण कराल. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना देखील करू शकता. विवाहितांना या आठवड्यात त्यांच्या जीवनसाथीमुळे समाजात सन्मान मिळेल. जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये आंबट गोड क्षण असणार आहे.  आठवड्याच्या शेवटी, वाटाघाटी करून परिस्थिती आपल्या अनुकूल करण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल. फेब्रुवारीच्या या आठवड्यात विवाहितांना त्यांच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)