मुंबई : फेंगशुईमध्ये Wind Chime (विंड चाइम) ला विशेष महत्त्व आहे. Wind Chime मध्ये अनेक प्रकार येतात त्यापैकी असे काही प्रकार असतात ज्यामध्ये आवाज येतो. घरात हे ठेवल्याने त्याचे अनेक फायदे मिळतात असं म्हटलं जातं. मात्र ते घरात लावण्याची योग्य पद्धत आणि दिशा माहिती असायला हवी.
विंड चाइममुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तू दोष दूर होतो. घर प्रसन्न राहातं, त्यातून येणाऱ्या मधूर आवाजमुळे घरातील नकारात्मक भाव दूर होतात. घर प्रसन्न राहातं.
विंड चाइम हे घरात पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावायला हवं. धातूपासून तयार केलेले विंड चाइम तयार केले असतील तर ते दक्षिण पूर्व किंवा दक्षिण दिशेला लावावे. लाकडापासून तयार केलेले विंड चाइम हे दक्षिणेला लावावेत.
फेंगशुईच्या मते विंड चाइम घरात आनंद घेऊन येतात. यामुळे नात्यांमधील तणावही दूर होतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहाते. भाग्योदय होतो असं मानलं जातं.
विंड चाइमला घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा खिडकीवर लटकवावं, गार्डन लॉन किंवा झाडावरही लावू शकता. हे घराची केवळ शोभा वाढवत नाही तर एक चांगले सकारात्मक ऊर्जाही निर्माण करतात.