Vastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. 

Updated: Feb 23, 2023, 09:42 PM IST
Vastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?  title=

Vastu Tips: आपल्या आयुष्यात वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा का वेळ निसटला की तो निसटला त्यातून कोणताच क्षण हा परत येत नाही. त्यामुळे आपण आपल्या वेळेचा जितका जास्त सदुपयोग करून घेऊ याचाच विचार करत असतो. आपल्याला योग्य वेळ दाखवतं ते म्हणजे आपलं घरी आणि ऑफिसमध्ये असलेले आपले घड्याळ. वास्तूशास्त्रातही (Vastu Tips for Clock) घड्याळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर वास्तूशास्त्रातही घड्याळ कुठे आणि कसे लावावे याबाबतही अनेक संदर्भ आहेत. घड्याळ नक्की कुठल्या दिशेला लावावे याबाबत अनेकांनाच प्रश्न असतो. त्यातून जर का ते चुकीच्या दिशेला किंवा ठिकाणी तुम्ही ठेवले असेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. (vastu tips in which direction we have put the clock at home and office)

कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. 

1. सर्वप्रथम तर असे म्हटले जाते की, घड्याळाच्या घालून कधी जाऊ नये. त्यामुळे दरवाज्याच्या वर घड्याळ (Where To Put Clock at Home) लावू नका त्यानं घरात नकारात्मकता पसरते. अशावेळी तुम्ही घड्याळ्याच्या खालून तर जात नाहीयेत ना याची काळजी घ्या. 

2. घड्याळ मग ते घरात असो वा ऑफिसमध्ये. ते कधीही दक्षिण दिशेला लावू नये. असं म्हणतात की त्यानं नकारात्मक उर्जा (Negetive Energy) पसरते. 

3. घड्याळ लावताना ते पुर्व, पश्चिम नाहीतर उत्तर दिशेला लावा. यामुळे सकारात्मकता वाढते आणि तुम्ही जर का अशाप्रकारे घड्याळ पुर्व, पश्चिम वा उत्तर दिशेला लावलंत तर तुम्हाला सकारात्मकता तर मिळतेच शिवाय तुमची कामंही नीट होतात आणि त्याचसोबत तुम्हाला कोणताच त्रास होत नाही. 

4. कधीही आपलं घड्याळ हे बंद ठेवू नका. घकरात बंद असलेली घड्याळं ही अशुभ मानली जातात. तेव्हा अशा सर्व गोष्टींची काळजी घ्या. 

5. घड्याळात वेळ पुढे किंवा मागे ठेवू नका तर योग्य वेळ लावून ठेवा. 

6. घरात तुम्ही गोल किंवा चौकोनी आकाराचे घड्याळ लावा. 

अनेकदा आपल्याला प्रेझेंट म्हणून नवीन घड्याळ मिळते. तेव्हा आपण ते आपल्या बेडरूममध्ये लावण्याचा प्रयत्न करतो परंतु बेडरूममध्ये कुठे लावावे हेच आपल्याला कळत नाही. आपण कुठेतरी वेळ खिडकीपाशी अथवा दारापाशी लावायला जातो पण लक्षात ठेवा की अशावेळी कुठेतरी भिंतीवर घड्याळ लावावे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)