Vastu tips : घरात तुळशीसोबत लावा ही 3 झाडं; असा होईल फायदा

वास्तूनुसार घरात शुद्ध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी तुळशीचे रोप लावलं पाहिजं.

Updated: Jul 15, 2022, 08:20 AM IST
Vastu tips : घरात तुळशीसोबत लावा ही 3 झाडं; असा होईल फायदा  title=

मुंबई : वास्तूमध्ये अनेक झाडाचं महत्त्व सांगितलं आहे. वास्तूनुसार घरात शुद्ध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी तुळशीचे रोप लावलं पाहिजं. असं म्हणतात की, तुळशीच्या रोपातून दोन वारे जातात, ते व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण वास्तूनुसार, तुळशीशिवाय तुम्ही तुमच्या घरात इतरही अनेक रोपं लावू शकता, ज्यामुळे घरात सकारात्मकता राहण्यास मदत होते.

शमीचे झाड

वास्तूनुसार घरामध्ये शमीचं रोप लावणं घरातील सदस्यांसाठी खूप शुभ मानलं जातं. शमीच्या रोपाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. शमीचे रोप तुळशीसोबत लावल्यास व्यक्तीला अनेक पटींनी फळ मिळते. शमी वनस्पती शनिवार आणि शनिदेवाशी संबंधित आहे.

केळ्याचं झाड

घरामध्ये केळीचं झाड लावल्याने नकारात्मकता दूर होते असं म्हणतात. घरामध्ये केळीचे रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. घरात तुळशीचं रोप लावलं तर घरात सुख-समृद्धी राहतं आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात, असंही म्हटलं जातं.

धोत्र्याचं झाडं

धोत्र्याच्या झाडाजवळ शिवाचं निवासस्थान असल्याचं मानलं जातं. अशा परिस्थितीत रविवारी आणि मंगळवारी काळ्या धोत्र्याचं रोप लावावं. शिवाला धोत्रा अर्पण केला जातो. असं म्हणतात की, रविवारी किंवा मंगळवारी झाड लावणं खूप चांगलं असतं. हे रोप घरात लावल्याने तुम्हाला भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)