Shukra-ketu Yuti: 10 वर्षांनी कन्या राशीत बनला शुक्र-केतू संयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shukra Or Ketu Yuti 2023:  शुक्राचं कन्या राशीत गोचर झालं आहे. दरम्यान केतू ग्रह यापूर्वीच राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतूचा संयोग तयार होत आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 15, 2023, 07:45 AM IST
Shukra-ketu Yuti: 10 वर्षांनी कन्या राशीत बनला शुक्र-केतू संयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस title=

Shukra Or Ketu Yuti 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह इतर ग्रहांशी संयोग बनवतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. 

नुकतंच शुक्राने कन्या राशीत गोचर केलं आहे. दरम्यान केतू ग्रह यापूर्वीच राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतूचा संयोग तयार होत आहे. हे संयोजन सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र या संयोगाचा काही राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

सिंह रास (Leo Zodiac)

शुक्र आणि केतूची जोडी तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. व्यवसायातही चांगली वाढ होणार आहे. ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. यावेळी व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. जीवनात संपत्ती मिळण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

शुक्र आणि केतूची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत.

मेष रास (Aries Zodiac)

केतू आणि मंगळाची जोडी तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकणार आहे. आपण शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळवू शकता. नोकरीमध्ये पगार वाढण्याची आणि नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची संधी मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )