Rahu And Shukra Conjunction In Meen: वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. यावेळी अशा स्थितीत एका ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी संयोग होतो. ग्रहांच्या या संयोगामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. तसंच सुख, समृद्धी आणि संपत्ती देणारा शुक्र 31 मार्च रोजी दुपारी 4:31 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे.
या काळात मीन राशीत राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. 23 एप्रिलपर्यंत शुक्र या स्थितीत राहणार आहे. जाणून घेऊया राहू आणि शुक्राचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, हे पाहूयात.
या राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग अकराव्या घरात होणार आहे. यावेळी प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करारावर स्वाक्षरी होऊ शकते. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊ शकतात. यासोबतच तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. पगारवाढ आणि बढतीचीही शक्यता आहे. तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता.
या राशीमध्ये राहू आणि शुक्र यांचा संयोग नवव्या भावात होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक त्यांच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. तुमची व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. सरकारी क्षेत्राशी संबंधित सर्व कामे सहज पूर्ण होतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.
या राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग सहाव्या भावात होणार आहे. तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही लाभ मिळतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. करिअरमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदा होणार आहे.तुम्हाला नोकरीसाठी परदेशात जाण्याची किंवा प्रवासाची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन डील किंवा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )