Shurka Gochar: शुक्र ग्रह करणार धनु राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकतात 'अच्छे दिन'

Venus Transit In Sagittarius: शुक्र ग्रह 18 जानेवारी रोजी रात्री 8:46 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरूच्या राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या व्यक्तींना राशींना सुखसोयी मिळतील.

सुरभि जगदीश | Updated: Jan 9, 2024, 09:10 AM IST
Shurka Gochar: शुक्र ग्रह करणार धनु राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकतात 'अच्छे दिन' title=

Venus Transit In Sagittarius: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शुक्र हा सुख आणि समृद्धी देणारा, ठराविक काळानंतर राशी बदलतो. त्यामुळे जेव्हा शुक्र त्याच्या राशीत बदल करतो, तेव्हा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. 

शुक्र ग्रह 18 जानेवारी रोजी रात्री 8:46 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरूच्या राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या व्यक्तींना राशींना सुखसोयी मिळतील. यावेळी लव्ह लाईफमध्ये रोमांच आणि प्रेम वाढणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते पाहुयात.

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीत शुक्र नवव्या घरात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल परिणाम होऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. उच्च अधिकारी खूश होतील आणि तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते.

मिथुन रास (Mithun Zodiac)

धनु राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र या राशीच्या सातव्या घरात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशातही व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायाला पुढे जाण्याची चांगली संधी मिळणार आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकणार आहे. नातेसंबंधांबद्दल जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक वाढ होऊ शकते. 

सिंह रास (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना अपार संपत्ती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. ज्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होईल. धनु राशीत शुक्राचे आगमन आर्थिक, व्यवसाय आणि करिअरसाठी खूप खास असणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )