Vinayaka Chaturthi November 2022: मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून धार्मिक दृष्टीने पवित्र महिना आहे. या महिन्यात चंपाषष्ठी, एकादशी, चतुर्थी, दत्त जयंती असे धार्मिक सण आहेत. प्रत्येक महिन्यात दोन शुक्ल आणि कृष्ण पक्ष येतो आणि त्यात दोन चतुर्थी येतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार चतुर्थी भगवान गणेशाला (God Ganesh) समर्पित आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी (Vinayak Chaturthi) आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी (Sankashti Chaturthi) संबोधलं जातं. मार्गशीर्ष महिन्याती शुक्ल पक्षातील चतुर्थी 27 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. मात्र संकष्टीप्रमाणे या दिवशी चंद्राचं दर्शन केलं जात नाही. या दिवशी चंद्राचं दर्शन केल्यास आरोप होतात, अशी समज आहे.
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी सुरु होते आणि 27 नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी संपते. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी 27 नोव्हेंबरला साजरी केला जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी 11 वाजून 06 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 12 मिनिटापर्यंत शुभ वेळ असेल.
बातमी वाचा- Guru Margi 2022: अखेर गुरू मीन राशीत मार्गस्थ, पाच महिने या राशींसाठी फायद्याचे, नंतर...
मार्गशीर्ष विनायक चतुर्थीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. 27 नोव्हेंबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. 27 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 53 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 38 मिनिटापर्यंत रवि योग आहे. त्यानंतर याच दिवशी दुपारी 12 वाजून 38 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 54 मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. या दोन्ही योग शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)