Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.
जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमानजी पाहिल्यास त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्रीराम दिसले तर ते खूप शुभ चिन्ह असल्याचं स्वप्नशास्त्रात सांगण्यात आले आहे. याचा अर्थ येत्या काही दिवसांत तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. तसंच, जर तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळण्याचे हे संकेत असतो. आगामी काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार आहे, असं शास्त्र सांगतो.
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री रामाचं मंदिर दिसलं तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुमचं नशीब चमकणार आहे. तसंच, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहे. तुम्ही ठरवलेले ध्येय लवकरच पूर्ण होण्याचे हे संकेत आहे. तुमच्या कामात समाधान मिळणार आहे.
जर तुम्हाला स्वप्नात हनुमानजी राम सोबत दिसत असतील तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ येत्या काही दिवसांत तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. कोणत्याही तणावातूनही तुम्हाला आराम मिळणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे.
जर तुम्हाला स्वप्नात हनुमानजींचे मंदिर किंवा हनुमानजीची मूर्ती दिसली तर समजून जा की हनुमानजींचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे. तसंच, जर तुमच्याविरुद्ध कोर्टात केस प्रलंबित असेल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्हाला स्वप्नात हनुमानचे बालस्वरूप दिसले तर ते देखील खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)