धार्मिक कार्यात श्रीफळाला का आहे महत्त्व? 'या' उपायांमुळे अडचणी होतात दूर, जाणून घ्या

नारळाची श्रीफळ म्हणूनही ओळख आहे. नारळाच्या वापराशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. आपण नारळाचे असेच काही फायदे जाणून घेऊया...

Updated: Aug 25, 2022, 01:57 PM IST
धार्मिक कार्यात श्रीफळाला का आहे महत्त्व? 'या' उपायांमुळे अडचणी होतात दूर, जाणून घ्या title=

Astro Upay Of Coconut :  नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रिय फळ आहे. नारळाची श्रीफळ म्हणूनही ओळख आहे. नारळाच्या वापराशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. आपण नारळाचे असेच काही फायदे जाणून घेऊया...

अडचणी-अडथळे दूर करण्यासाठी : अनेकदा आपल्या काही समस्यांना सामोरे जावे लागते. वारंवारं येणाऱ्या अडचणीमुळे असे वाटते की काही तरी चुकीची गोष्ट घडणार आहे. तेव्हा घाबरून न जाता, पाणी असलेला नारळ 21 वेळा आपल्या अंगावरून फिरवून एखाद्या मंदिरातीस हवनकुंडात टाकून जाळून द्यावा. हा उपाय आठवड्यातून 5 वेळा प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी करा.

नोकरी-व्यवसायात यश मिळवण्यासाठी : नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवायचे असेल तर घरात नारळाचे झाड लावा. यामुळे गुरु ग्रह शक्तीशाली होऊन तुम्हाला शुभ आशिर्वाद मिळेल आणि लवकरच तुम्हाला यश मिळेल.  तसेच घरात पैशांचा ओघ देखील वाढेल. घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नारळाचे झाड लावा.

वाईट नजर दूर करण्यासाठी उपाय : वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी मंगळवारी लाल कपड्यात नारळ बांधून अंगावरून सात वेळा फिरवून घ्या आणि हनुमानजींच्या चरणी अर्पण करा.

पैशाची तंगी दूर करण्यासाठी उपाय : शुक्रवारी लाल वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी.  आणि पूजेतला नारळ देवीला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी हा नारळ लाल कपड्यात गुंडाळा घरातील अशा ठिकाणी ठेवा जेथे बाहेरील कोणीही पाहू शकणार नाही. काही दिवसांतच लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव सुरू होईल.

प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय : जर तुम्हाला मेहनतीचे फळ मिळत नसेल किंवा तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर शनिवारी शनि मंदिरात शनिदेवाला पाण्यासोबत 7 नारळ अर्पण करा. नंतर हे नारळ नदीत विसर्जित करा. तुमचे अडथळे दूर होतील.   

 

( Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही )