'या' राशींचं चमकणार भाग्य, फक्त 24 तास करावी लागेल प्रतीक्षा

'या' राशींच्या व्यक्तींनी फक्त 24 तास करावी लागेल प्रतीक्षा, त्यानंतर चमकणार भाग्य  

Updated: Jul 16, 2022, 07:48 AM IST
'या' राशींचं चमकणार भाग्य, फक्त 24 तास करावी लागेल प्रतीक्षा title=

मुंबई : ज्‍योतिष शास्त्रात ग्रहांना फार महत्त्व असतं. आयुष्यात अनेक चांगले वाईट दिवस येतात. पण आता काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. 17 जुलै रोजी बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम व्यक्तीच्या व्यवसाय, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होतो. सर्व 12 राशींवर त्याचा प्रभाव असला तरी तो विशेषतः या 3 राशींवर दिसून येईल. या राशींसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या तीन राशी...

मिथुन राशी - 
बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार असल्यामुळे या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात व्यवसायात मोठे सौदे होण्याची शक्यता आहे. यातून चांगला धनलाभ होईल. भागीदारीच्या कामासाठीही हा काळ अनुकूल आहे.  बुधाच्या गोचरदरम्यान, भाषण आणि मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोक जसे वकील, मार्केटिंग वर्कर आणि शिक्षक इत्यादींसाठी हा काळ चांगला सिद्ध होईल.

कन्या राशी - 
या राशीच्या गोचर कुंडलीतून बुध ग्रहाचे गोचर 11व्या स्थानात  होत आहे.ज्योतिषशास्त्रात हे एक महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे यावेळी उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळेल. बुध गोचर दरम्यान जीवनसाथीसोबतच्या नात्यात गोडवा राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. हा काळ अचानक आर्थिक लाभ देईल. 

तुळ राशी - 
या काळात व्यवसाय आणि नोकरीची नवीन ऑफर येऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. बुधा गोचर तुमच्या कार्यशैलीत वाढ करेल. यामुळे कामाच्या ठिकाणी तुळ राशीच्या व्यक्तींचं कौतुक होईल. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)