Zodiac Signs : मार्च महिना जवळ आला की नोकरदार वर्गाला वेध लागतात ते इंक्रीमेंट (increment salary)आणि प्रमोशनचे (promotion) ...प्रत्येका चिंता सतावते की यावेळी इंक्रीमेंट होणार की नाही. झालं तर किती टक्के होईल? आपल्या कामाचा, मेहनतीचा योग्य मोबाईल मिळणार का असे अनेक प्रश्न सध्या प्रत्येकाचा मनात सुरु आहेत. ज्योतिषशास्त्रात (Astrology news in marathi) तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. शास्त्रात असं मानतात की ग्रह बदलाचा (zodiac signs) आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अशातच मार्च महिन्यात चार ग्रहांची (March Grah Gochar) स्थिती बदलत आहे. त्याचा परिणाम लोकांवरही दिसून येईल. मार्च महिन्यात मंगळ मिथुन (Mars Gemini) राशीत तर शुक्र मेष (Venus Aries) राशीत प्रवेश करेल. याशिवाय सूर्य गुरूच्या राशीत मीन राशीत प्रवेश करेल आणि बुधही मीन राशीत जाऊन बुधादित्य योग तयार करेल. यानंतर बुध मीन राशीतून मेष राशीत जाईल. अशा परिस्थितीत हा बदल अनेक राशींवरही परिणाम करणार आहे. ज्याचा परिणाम पगारवाढ आणि पदोन्नतीवर होऊ शकतो. (zodiac signs good increment and promotion in march Grah Nakshatra March Grah Gochar effect in marathi)
राशीच्या लोकांना मार्चमध्ये येणारा योगायोगाचा खूप फायदा घेऊन येणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित अनेक संधी मिळतील. या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळेल. कामाला नवी ओळख निर्माण होईल. दरम्यान या राशीच्या लोकांनी गाईला पालक खायला दिल्यास फायदा होईल.
या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप महत्त्वाचा असेल. नोकरदार लोकांची प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचं नवीन साधन मिळेल. करिअरशी संबंधित संधी मिळतील. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी नवनवीन संधी आणि प्रगती घेऊन येणार आहे.
या महिन्यात तूळ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. एकंदरीच या महिन्यात तुमची आर्थिक प्रगती होणार आहे.
राशीच्या लोकांसाठी मार्च महिना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. बुध आणि गुरूच्या संयोगाने मार्चमध्ये बुधादित्य योग तयार होईल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना या महिन्यात नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)