कॉमनवेल्थ स्पर्धसाठी भारतीय अॅथलेटीक्स संघ सज्ज

भारतीय अॅथलिटीक्स महासंघाने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताच्या ३१ सदस्यीय ट्रॅक आणि फिल्ड संघाची घोषणा केली आहे. यात १८ पुरूष तर, १३ महिला खेळाडूंचा समावेश आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 11, 2018, 10:38 AM IST
कॉमनवेल्थ स्पर्धसाठी भारतीय अॅथलेटीक्स संघ सज्ज

नवी दिल्ली : भारतीय अॅथलिटीक्स महासंघाने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताच्या ३१ सदस्यीय ट्रॅक आणि फिल्ड संघाची घोषणा केली आहे. यात १८ पुरूष तर, १३ महिला खेळाडूंचा समावेश आहे. 

दरम्यान, ग्लासगोमध्ये या आधी झालेल्या कॉमन गेम्समध्ये भारताने ट्रॅक आणि फिल्डमध्ये ३२ खेळाडू उतरवले होते. यात भारताला ३ पदकांवर समाधान मानावे लागले होते. 

भारतीय अॅथलेटिक्स टीम:

पुरूष : जिन्सन जॉनसन, दारून अयास्वामी , तेजश्विन शंकर , सिद्धार्थ यादव , श्रीशंकर, अरपिंदर सिंह, राकेश बाबू, तेजिंदर पाल सिंह तूर, नीरज चोपड़ा, विपिन कसाना  इरफान थोडी, मनीष सिंह रावत, मोहम्मद अनस, जीवन के, अमोज जॅकब, कुन्हू मोहम्मद, जीतू बेबी, अरोकिया राजीव

महिला : हिमा दास, सुरिया एल ,नयना जेम्स ,नीना पिंटो ,सीमा पूनिया ,नवजीत कौर ढिल्ला, पुनाम एच , सौम्या बेबी ,खुशबीर कौर , एम आर पूवम्मा, सोनिया बैश्य, सरिताबेन गायकवाड, जौना मुरमू

कॉमनवेल्थ स्पर्धसाठी भारतीय अॅथलेटीक्स संघ सज्ज |31 member athletics team for CWG