RCB च्या बॉलरच्या बोटाला 5 टाके, मुंबई विरुद्ध खेळण्याबाबत शंका

आरसीबीसाठी एक बॅडन्यूज आहे.

Updated: Oct 27, 2020, 06:39 PM IST
RCB च्या बॉलरच्या बोटाला 5 टाके, मुंबई विरुद्ध खेळण्याबाबत शंका

दुबई : आरसीबी (RCB)चा फास्ट बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) आयपीएल 2020 (IPL 2020) दरम्यान मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध खेळणार का याबाबत शंका आहे. कारण चेन्नई सुपरकिंग्स (CSK)च्या विरुद्ध मॅचमध्ये त्याच्या हाताला रविवारी जखम झाली. ज्यामुळे त्याच्या हाताला 5 टाके लागले आहेत.ॉ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील सैनीची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट टीम (बीसीसीआय) आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो जाणार की नाही यासाठी निर्णय घेईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याबाबत निर्णय घेण्यात येईल.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 18 व्या ओव्हरमध्ये त्याच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली होती. त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. त्याच्या हाताला 5 टाके लागले आहे. टीमचे फिजियो इवान स्पीचले यांनी म्हटलं की, सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली. आमच्याकडे चांगले सर्जन होते. ज्यांनी त्याच्या हाताला 5 टाके लावले आहेत. निरीक्षणानंतर तो पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.'