नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. तो तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होतोय. डेविलियर्सने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. एबी डे विलियर्सने आतापर्यंत ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० सामन्यात आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेय. ३४ वर्षीय क्रिकेटर डेविलियर्सच्या मते रिटायर होण्याची हीच योग्य वेळ असल्याने त्याने हा निर्णय घेतलाय.
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळल्यानंतर मी निवृत्त होतोय. आता इतरांनी ही जागा घेण्याची गरज आहे. माझा टर्न संपला आणि खरे सांगायचे तर मी थकलो. हा निर्णय कठीण होता. खूप वेळ मी याबाबत विचार केला त्यानंतर हा निर्णय घेतला. चांगले क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेणे योग्य आहे, असे डेविलियर्स म्हणाला.
मला आतापर्यंतच्या दिलेल्या सहकाराबद्दल इतर खेळाडू आणि स्टाफचे आभार मानतो.
इथेच थांबवण्याची ही योग्य वेळ आहे. मी सर्वांचे आभार मानतो. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील माझ्या क्रिकेट चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आभार. पुढे खेळण्याबाबतचे माझे कोणतेही प्लान्स नाही आहेत.
डेविलियर्सने क्रिकेट जगतात अनेक विक्रमांना गवसणी घातलीये. त्याने वनडेत १६ चेंडूत अर्धशतक ठोकलेय. तर ३१ चेंडूत शतक झळकावलेय. तर ६४ चेंडूत १५० धावा केल्यात. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २७८ या सर्वाधिक धावा केल्यात.