आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच फेरीत सायना बाद

चीनच्या खेळाडून पराभूत 

Updated: Nov 13, 2019, 06:03 PM IST
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच फेरीत सायना बाद
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : बॅडमिंटन या खेळात भारताचं अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करणारी आणि या खेळात वैश्विक स्तरावर महत्त्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या सायना नेहवाल हिला हाँग काँग ओपन  या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी चीनच्या Cai Yan Yanकडून तिला पराभूत व्हावं लागलं. 

Cai Yan Yanकडून  पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची सायनाची ही सलग दुसरी वेळ आहे. चायना ओपन स्पर्धेतही सायनाला अशाच पद्धतीच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. चायना ओपनमध्ये २४ मिनिटांच्या खेळात  ९-२१, १२- २१ या फरकाने सायना पराभूत झाली होती. 

हाँग काँग ओपनच्या पहिल्या फेरीत Cai Yan Yanने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड केली होती. परिणामी सामन्याच्या शेवटपर्यंत तिची ही पकड पाहायला मिळाली. Cai Yan Yanने पहिले दोन गुण मिळवल्यानंतर सायनानेही एका गुणाची कमाई करत सामन्यात २-१ अशा फरकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सामना जसजसा पुढे जात होता तसतसा दोन्ही खेळाडूंकडून विजयासाठीचा प्रयत्न अधिक जोमाने सुरु होता. पण, जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असणाऱ्या Cai Yan Yanने अखेर सायनाला पराभूत केलं.