वर्णद्वेशी टिप्पणीनंतर त्या खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची माफी!

खेळात वर्णद्वेषाला स्थान नाही, पण त्यासंबंधीची प्रकरणं वेळोवेळी समोर येतात.

Updated: Nov 19, 2021, 11:27 AM IST
वर्णद्वेशी टिप्पणीनंतर त्या खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची माफी! title=

दिल्ली : खेळात वर्णद्वेषाला स्थान नाही, पण त्यासंबंधीची प्रकरणं वेळोवेळी समोर येतात. भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य घटक असलेल्या चेतेश्वर पुजारालाही वर्णद्वेषाचं बळी व्हावं लागलंय. 2015 मध्ये यॉर्कशायर काउंटीकडून खेळताना पुजाराला सहकारी खेळाडू 'स्टीव्ह' म्हणायचे.

आता समरसेटचा वेगवान गोलंदाज जॅक ब्रूक्सने पुजाराला 'स्टीव्ह' म्हटल्याबद्दल माफी मागितली आहे. ब्रूक्स त्या काळात फक्त यॉर्कशायर काउंटीसाठी क्रिकेट खेळायचा. तसंच 2012 मध्ये केलेल्या दोन वर्णद्वेषी ट्विटसाठी ब्रूक्सने माफी मागितली होती. 

ब्रूक्सवर इंग्लिश वेगवान गोलंदाज टायमल मिल्स आणि ऑक्सफर्डशायरकडून मायनर काऊंटी क्रिकेट खेळणाऱ्या स्टीवर्ट लॉडॅट यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी शब्द वापरल्याचा आरोप आहे.

जॅक ब्रूक्स यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "मी कबूल करतो की 2012 मध्ये माझ्या दोन ट्विटमध्ये वापरलेली भाषा योग्य होती. ती वापरल्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. ज्यांनी हे ट्विट पाहिलं त्यांच्याकडून मी केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल मी बिनशर्त माफी मागतो."

ब्रूक्स पुढे म्हणाले, "असं करणं अपमानास्पद आणि चुकीचं होतं असं मला वाटतं. मी चेतेश्वरशी संपर्क साधला आहे आणि त्याचा किंवा त्याच्या कुटुंबाचा अपमान झाल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यावेळी मी याला वर्णद्वेषी वागणूक म्हणून घेतलं नव्हतं."